Gondia Politiical News : संजय राऊत हे १०३ दिवस जेलमध्ये राहून आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे आणि त्या मानसिकतेतून ते बोलत असतात, असा खोचक टोला भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी लगावला आहे. (Our government is not the government of Facebook Live)
गोंदियामध्ये काल (ता. १५) चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत गोंदियात लोकांच्या दारावर जाऊन ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमासाठी माती संकलन करण्यात आली. या प्रसंगी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी उद्धव ठाकरे यांना त्यांनी जोरदार टोला लगावला. त्या म्हणाल्या, महाराष्ट्रातील आमचे सरकार हे फेसबुक लाइव्हचे सरकार नाही, तर लोकांच्या दारी जाऊन त्यांच्या चेहऱ्यांवर हास्य आणणारे सरकार आहे.
स्वातंत्र्याची ७५ वर्षे भारतीय संस्कृतीचे आणि कर्तृत्वाचे स्मरण करण्यासाठी ‘मेरी माटी मेरा देश’ हा उपक्रम भारत सरकार राबवित आहे. गोंदिया शहरातदेखील भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षांनी फेरफटका मारला.
पिक्चर अभी बाकी है...
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आपण विदूषकाचे कपडे पाठविले होते. हा प्रश्न चित्रा वाघ यांना विचारला असता, आमच्या नेत्यांवर वैयक्तिक टीका कराल, तर पिक्चर अभी बाकी है..., असे म्हणत वाघ (Chitra Wagh) यांनी ठाकरे गटाला सूचक इशारा दिला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूरच्या सभेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर शरीरावरून टीका केली होती.
त्यानंतर चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांना विदूषकाचे कपडे पाठविले होते. एखाद्या नेत्याच्या शरीरयष्टीवरून टीका करणे हे उद्धव ठाकरे यांना शोभत नाही. उद्धव ठाकरे हे आमच्या नेत्यांच्या टिवल्या-बावल्या करतात आणि लोकांना हसवतात तसेच हसवण्याचे काम हे विदूषक करतात. म्हणून उद्धव ठाकरे यांना विदूषकाचे कपडे आम्ही पाठवले, असे चित्र वाघ म्हणाल्या.
अडीच वर्षांत तुम्ही काय केलं?
या राज्यावर ४० वर्षं मराठी नेते राज्य करत होते. त्यावेळी कुणी मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. मराठ्यांना आरक्षण मिळायला हवे, ही सरकारची भूमिका आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केली. त्या अडीच वर्षांत उच्च न्यायालयात हे आरक्षण टिकवू शकले नाहीत, असेही चित्रा वाघ म्हणाल्या.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.