Chitra Wagh Vs Sanjana Ghadi: भाजपच्या चित्रा वाघ अन् ठाकरे गटाच्या संजना घाडी यांच्यात जुंपली; काव्यपंक्तीतून टीका

Political News: चित्रा वाघ यांच्या या टीकेला ठाकरे गटाच्या उपनेत्या संजना घाडी यांचे सणसणीत उत्तर
Chitra Wagh Vs Sanjana Ghadi
Chitra Wagh Vs Sanjana GhadiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि भास्कर जाधव यांना विदूषक म्हणत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी बुधवारी विदूषकाचा पोशाख पाठवला. त्यातून ठाकरेंच्या कायम लक्षात राहावं की, ते आता फक्त करमणुकीपुरतेच उरले आहेत, अशी बोचरी टीका त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन केली होती.

चित्रा वाघ यांच्या या टीकेला आता ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या संजना संजय घाडी यांनी शिवसेना स्टाईलने सणसणीत उत्तर देत पलटवार केला. त्यामुळे आता चित्रा वाघ आणि संजना घाडी या दोन रणरागिनी भिडल्याचे दिसून येत आहे.

Chitra Wagh Vs Sanjana Ghadi
Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी चौंडीत दहा दिवसांपासून उपोषण; सरकारचे दुर्लक्ष ? राम शिंदे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

घाडी यांनी यमक साधणाऱ्या पंक्तीतून चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल केला. तर त्याला चित्रा वाघ यांनीही लगेच तसेच उत्तर काव्यातूनच दिले. त्यामुळे या दोन्ही रणरागिनींचा हा टीकेचा नवा ट्रेंड चर्चेचा विषय झाला. फक्त या काव्यपंक्ती त्यांच्या स्वता:च्या आहेत का हे कळू शकलेले नाही.

वाघ या सरड्याप्रमाणे रंग बदलतात, अशी जळजळीत टीका घाडींनी केली. तर, ठाकरे आणि शिवसेनेवर तुटून पडणारे भाजपचे किरीट सोमय्या, राणे, शेलार, कदम यांनाही त्याच विदूषकांच्या वेशभूषेत सोडा, असा टोलाही घाडी यांनी लगावला.

संजना घाडी यांनी चित्रा वाघ यांच्यावर काव्यमय हल्लाबोल केल्यानंतर घाडी यांच्या या टीकेवर चित्रा वाघ यांनीही त्याच स्टाईलमध्ये काव्यपंक्तीतून उत्तर दिले. "विदूषकांना विदूषक म्हंटलं की फार येतो राग, कपाळावरची शीर उडते नि अंगाची होते आग, आम्हाला आता शिकवू लागलात तुम्ही नैतिकता....", अशा शब्दात चित्रा वाघ यांनी निशाणा साधला.

Chitra Wagh Vs Sanjana Ghadi
Jitendra Awhad News : 'जितेंद्र आव्हाडांचे मराठा आंदोलनात दंगे पेटवण्याचे...'; शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com