छोटू भोयर म्हणाले, मी असमर्थता दर्शविली नव्हती; ‘त्या’ पत्रावर अनेकांना शंका…

उमेदवार बदलल्याचे पत्र प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi) यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले होते. त्यामुळे या पत्रावरसुद्धा (Letter) शंका घेतल्या जात आहे.
Dr. Ravindra - Chotu Bhoyar
Dr. Ravindra - Chotu BhoyarSarkarnama

नागपूर : नागपूर विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाच्या काही तासांपूर्वी उमेदवार बदलवण्याची नामुष्की कॉंग्रेसच्या नेत्यांवर आली. प्रदेश कॉंग्रेसकडून (State Congress Committee) आलेल्या पत्रामध्ये ‘छोटू भोयर यांनी असमर्थता दर्शवल्याचे समजते’, असे लिहिले आहे. यावर डॉ. रवींद्र ऊर्फ छोटू भोयर (Chotu Bhoyar) यांनी आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले, काल सायंकाळी ७.३० वाजता पत्र मिळाले, तोपर्यंत मी असमर्थता व्यक्त केली नव्हती. अनेकांना या पत्रावरही संशय आहे.

भाजपच हा माझा भूतकाळ आहे. आता मी काँग्रेसमध्ये आहे. पक्ष सोडताना जाहीर केल्याप्रमाणे शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस सोबतच राहील, असेही छोटू भोयर यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले. मतदारांनी सतसतविवेक बुद्धीने मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले. रवींद्र भोयर यांच्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भर बैठकीत आग्रह धरला होता. पटोलेंनी त्यांची हमीसुद्धा घेतली होती. काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांच्या स्वाक्षरीने भोयर काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून पत्र काढण्यात आले होते. उमेदवार बदलण्यासाठी दिल्लीच्या हायकामांडकडे पत्र पाठवण्यात आले होते. मात्र उमेदवार बदलल्याचे पत्र प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले होते. त्यामुळे या पत्रावरसुद्धा शंका घेतल्या जात आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेसने आपला अधिकृत उमेदवार बदलवून रवींद्र भोयर यांना चांगलाच धक्का दिला. त्यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या मतदारांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला आहे. नाट्यमय बदलामुळे ही निवडणूक रंगतदार होत असल्याचे दिसून येते.

रवींद्र भोयर प्रचार करीत नसल्याने दोन तीन दिवसांपासून काँग्रेसमध्ये चांगलाच असंतोष उफाळून आला होता. सुमारे पंधरा दिवसांचा वेळ असतानाही ते एकाही मतदाराला भेटले नाही. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनेसुद्धा उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे आरामात विजयी होतील, असे चित्र दिसत होते. मात्र काँग्रेसचे नेते अचानक सक्रिय झाले होते. दोन दिवसांपासून त्यांनी बैठका घेणे सुरू केले. बुधवारी दिवसभर प्रमुख नेत्यांचे बैठक सत्र सुरू होते.

Dr. Ravindra - Chotu Bhoyar
माझे मत कॉंग्रेस समर्थित उमेदवार देशमुख यांनाच : छोटू भोयर

याबैठकीला अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख हेसुद्धा उपस्थित होते. तत्पूर्वी काँग्रेसच्या मतदारांचासुद्धा कौल जाणून घेण्यात आला होता. त्यानंतर उमेदवार बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याकरिता काँग्रेसच्या हायकमांडकडे पत्र पाठवण्यात आले होते. त्याला बुधवारी रात्री उशिरापर्यंत उत्तर देण्यात आले नव्हते. त्यामुळे काँग्रेस संभ्रमात पडली होती. तत्पूर्वी नेत्यांनी मात्र आपल्या मतदारांपर्यंत संदेश पोचवणे सुरू केले. गुरुवारी साडेसात वाजताच्या सुमारास प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या स्वाक्षरीचे पत्र काँग्रेसच्यावतीने व्हायरल करण्यात आले.

असे आहे पत्र..

काँग्रेसचे उमेदवार रवींद्र भोयर यांनी निवडणूक लढविण्यास असमर्थता दर्शवल्याचे समजते. त्यामुळे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मान्यतेने प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार मंगेश सुधाकर देशमुख यांना काँग्रेस पक्षातर्फे पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे. याची माहिती मतदान करणाऱ्या सर्व काँग्रेसच्या सदस्यांना तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना द्यावी असे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पत्रात म्हटले आहे.

एकूण मतदार ः ५५९

महापालिका ः १५५

जि.प. ः७१

न.प. ः ३३३

मतदान केंद्र ः १५

मतमोजणी ः१४ डिसेंबर

पक्षीय बलाबल..

काँग्रेस- १४४

भाजप -३१४

राष्ट्रवादी- १५

शिवसेना- २५

विदर्भ माझा-१७

इतर -१७

शेकाप- ०६

अपक्ष- १०

बसप-

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com