माझे मत कॉंग्रेस समर्थित उमेदवार देशमुख यांनाच : छोटू भोयर

मी (Chotu Bhoyar) कॉंग्रेसच्या निर्णयाच्या विरोधात जाणार नाही. नेत्यांच्या निर्णयाचं समर्थनच करतो. त्यामुळे भाजप नेत्यांना (BJP Leaders) आनंदी होण्याची काहीच गरज नाही.
Dr. Ravindra - Chotu Bhoyar
Dr. Ravindra - Chotu BhoyarSarkarnama

नागपूर : नागपूर विधानपरिषद निवडणुकीसाठी कॉंग्रेसने काल रात्री आपला उमेदवार बदलविला. त्यानंतर विविध चर्चांना पेव फुटले. छोटू भोयर (Chotu Bhoyar) काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळासह सामान्य जनतेचेही लक्ष लागले होते. ‘मी अजूनही कॉंग्रेसमध्येच (Congress) आहे आणि कॉंग्रेस समर्थीत उमेदवार मंगेश देशमुख यांनाच मत देणार असल्याचे डॉ. रवींद्र ऊर्फ छोटू भोयर यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले.

छोटू भोयर म्हणाले, १७ दिवसांपूर्वी मी भारतीय जनता पक्ष (BJP) सोडून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता, तो केवळ विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून नव्हे, तर भाजपमध्ये माझ्यावर सतत अन्याय झाला म्हणून पक्ष सोडला. कॉंग्रेस नेत्यांनी जल्लोषात माझे स्वागत केले, मला मान सन्मान दिला. मला विधानपरिषदेची उमेदवारी दिली, त्याबद्दल कॉंग्रेस नेत्यांचा मी आभारी आहे. आता कॉंग्रेस सोडून जाण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. मी कॉंग्रेसमध्येच राहून पुढील कार्य करीत राहणार आहे.

Dr. Ravindra - Chotu Bhoyar
नाना पटोलेंनी हमी घेतलेले भोयर यांची शांतता अन् राष्ट्रवादीचा संभ्रम...

आज कॉंग्रेसला जर असे वाटत असेल की, छोटू भोयरला उमेदवारी देऊन कॉंग्रेसचे कार्यकर्ते समाधानी नाहीत. त्यामुळे त्यांनी वेगळा पर्याय निवडला असेल, तर त्याला माझी काहीही हरकत नाही. मी कॉंग्रेसच्या निर्णयाच्या विरोधात जाणार नाही. नेत्यांच्या निर्णयाचं समर्थनच करतो. त्यामुळे भाजप नेत्यांना आनंदी होण्याची काहीच गरज नाही. भाजपमधून कॉंग्रेसमध्ये आलेल्या छोटू भोयर यांना उमेदवारी दिल्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्ते नाराज आहेत, त्यामुळे उमेदवार बदलला हेच एकमेव कारण असेल, तर मग मंगेश देशमुखसुद्धा कॉंग्रेसचे नाहीत. मग ते कार्यकर्त्यांना कसे चालतील, असे विचारले असता, कदाचित ते पूर्वाश्रमीचे कॉंग्रेस कार्यकर्ता असतील, असे उत्तर भोयर यांनी दिले आणि या विषयावर अधिक बोलण्याचे टाळले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com