Devendra Fadnavis cousin Alhad Kaloti : मुख्यमंत्री फडणवीसांचे भाऊ निवडणुकीच्या रिंगणात

Alhad Kaloti, Cousin of CM Devendra Fadnavis, to Contest Chikhaldara Amravati Municipal Election from BJP : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आल्हाद कलोती स्वयंसेवक असून, आजवर ते कधी राजकारणात सक्रिय नव्हते.
Devendra Fadnavis cousin Alhad Kaloti
Devendra Fadnavis cousin Alhad KalotiSarkarnama
Published on
Updated on

Amravati municipal polls BJP : माजी खासदार नवनीत राणा, माजी आमदार बच्चू कडू आणि आमदार संजय खोडके यांच्यामुळे अमरावती जिल्हा सातत्याने चर्चेत असतो. मात्र नगर पालिकेच्या निवडणुकीमुळे एक नवे नाव आता चर्चेत आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती हे चिखलदरा नगर पालिका निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. ते भाजपकडून नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदार रवी राणा यांच्या स्वाभिमानी पार्टीने त्यांना पाठिंबासुद्धा जाहीर केला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) आल्हाद कलोती स्वयंसेवक आहे. आजवर ते कधी राजकारणात सक्रिय नव्हते. मात्र संघाच्या माध्यमातून ते सर्वांच्या संपर्कात होते. यावेळी ते नगरसेवकाची प्रत्यक्ष निवडणूक लढणार आहेत. मुख्यमंत्री यांचे भाऊ असल्याने या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

चिखलदरा विदर्भाचे प्रमुख पर्यटन स्थळ आहे. थंड हवेचे ठिकाण असलेले चिखलदराला विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांनी त्यांच्या उमेदवारीसाठी पुढाकार घेतला असल्याचे समजते. चिखलदरा आणि मेळघाट परिसरातील आदिवासी क्षेत्रामध्ये राणा दाम्पत्यांचा मोठा जनसंपर्क आहे. असे असले तरी चिखलदरा नगर पालिकेत काँग्रेसचा बोलबाला होता.

Devendra Fadnavis cousin Alhad Kaloti
Devendra Fadnavis narco test controversy : देवेंद्र फडणवीस यांची नार्को टेस्ट करा; काँग्रेस नेत्याच्या मागणीनं खळबळ

काँग्रेसचे राजेंद्रसिंग सोमवंशी हे नगराध्यक्ष होते. त्यानंतर त्यांच्या पत्नी यासुद्धा नगराध्यक्ष होत्या. आता सोमवंशी कुटुंब भाजपमध्ये दाखल झाले आहेत. तेच पुन्हा एकदा नगराध्यक्षपदाची निवडणूक लढणार असल्याचे समजते. सध्या भाजपने अद्याप कुणाच्याही नावाची घोषणा केलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील आमदार होते. नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघातून ते विधान परिषदेत होते. मुख्यमंत्री यांच्या काकू शोभाताई फडणवीस यासुद्धा आमदार होत्या. शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये त्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री होत्या. फडणवीस युतीच्या काळात मुख्यमंत्री असताना शोभाताई विधान परिषदेवर होत्या.

Devendra Fadnavis cousin Alhad Kaloti
Palghar Sadhu lynching case : पालघर साधू हत्याकांड; आरोपी काशिनाथ चौधरीच्या हाती 'कमळ', भाजपने 'मविआ'वर उठवली होती आरोपांची राळ!

चिखलदरा विदर्भाचे प्रमुख पर्यटन स्थळ आहे. थंड हवेचे ठिकाण असलेले चिखलदराला विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी त्यांच्या उमेदवारीसाठी पुढाकार घेतला असल्याचे समजते. चिखलदरा आणि मेळघाट परिसरातील आदिवासी क्षेत्रामध्ये राणा दाम्पत्यांचा मोठा जनसंपर्क आहे. असे असले तरी चिखलदरा नगरपालिकेत काँग्रेसचा बोलबाला होता.

काँग्रेसचे राजेंद्रसिंग सोमवंशी हे नगराध्यक्ष होते. त्यानंतर त्यांच्या पत्नी यासुद्धा नगराध्यक्ष होत्या. आता सोमवंशी कुटुंब भाजपमध्ये दाखल झाले आहेत. तेच पुन्हा एकदा नगराध्यक्षपदाची निवडणूक लढणार असल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील आमदार होते. नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघातून ते विधान परिषदेत होते.

मुख्यमंत्री यांच्या काकू शोभाताई फडणवीस यासुद्धा आमदार होत्या. शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये त्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री होत्या. फडणवीस युतीच्या काळात मुख्यमंत्री असताना शोभाताई विधान परिषदेवर होत्या. अंध विद्यालय, सामाजिक शैक्षणिक क्षेत्राच्या विकासात कोलती परिवाराचे मोठे योगदान आहे. कलोती यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी त्यांच्यासोबत अमरावती जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी संजय कुटे, खासदार अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा प्रामुख्याने उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com