

Maharashtra government scheme protest : दोन महिन्यांपासून लाभ मिळाला नाही. केवायसी करून देखील, अपडेट होत नाही. शेजारचीला लाभ मिळतो, मग मला का नाही? वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ इथल्या माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या या तक्रारी आहेत.
या मुळे संतापलेल्या लाडकी बहिणींनी थेट मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला. 'लाभ द्यायचा असेल, तर सरसकट द्या, नाहीतर सगळ्यांचा थांबवा,' अशा शब्दात लाभ न मिळाल्या लाभार्थी महिलांनी ठणकावलं आहे.
वाशिम (Washim) जिल्हाधिकारी कार्यालयावर, लाभ न मिळालेल्या लाभार्थी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. दोन महिन्यांचा लाभ न मिळाल्याने महिलांनी संप्ताप व्यक्त केला. ई-केवायसी करून देखील, प्रशासनाकडून ती न झाल्याचे सांगितले जात आहे. 'लाभ द्यायचा असेल, तर सरसकट द्या, नाहीतर सर्वांचा लाभ बंद करा,' असा संताप महिलांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील (Ladki Bahin Yojana) महिलांचा लाभ कायमस्वरूपी बंद होणार, या चर्चेमुळे महिलांनी बुलढाण्याच्या जिल्हा महिला व बालकल्याण कार्यालयात धडक दिली. दोन महिन्यापासून लाभ कशामुळे बंद झाला, याच्या चौकशीसाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती.
बुलढाणा जिल्ह्यात साडेसहा लाखाच्या जवळपास महिला योजनेचा लाभ घेत होत्या. मात्र ई-केवायसीमध्ये त्रुटी आल्याने जवळपास 30 हजार महिलांचा लाभ थांबलेला आहे. ई-केवायसीमध्ये त्रुटी आढळल्याच्या प्रमुख कारणामुळेच हा लाभ थांबण्याची माहिती आहे. त्यामुळे ई-केवायसीमधील ही त्रुटी दुरुस्त करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी आता लाभार्थी महिलांनी केली.
योजनेचा हप्ता न मिळाल्याने यवतमाळ मधील लाभार्थी महिलांनी महिला व बालकल्याण विभागात धडक दिली. महिला लाभार्थी यावेळी चांगल्याच आक्रमक झाल्याचे चित्र पहायला मिळाले. अधिकार्यांसह कर्मचार्यांवर संताप व्यक्त केला. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून लाभ मिळवून द्या, अन्यथा सर्वांचा लाभ बंद करा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. दरम्यान महिला व बालकल्याण विभागाने ई-केवायसीची लिंक पुन्हा सुरू करावी, असे पत्र थेट सरकारकडे पाठवले आहे.
योजनेच्या लाभाचे पैसे न मिळालेल्या रूपाली महाजन यांनी, दहा महिन्यांपर्यंत मला पैसे आले. त्यानंतर मला लाभ मिळायचा असेल, तर योजनेसाठी ई-केवायसी करायला सांगितले. ई-केवायसी एकदा सोडून, दोनदा करायला लावली. त्यानंतर देखील योजनेच्या लाभाचा हप्ता आला नाही. दोन महिने झाले, तरी लाभ आला नाही. माझ्या शेजारी असणाऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला. परंतु मला लाभ आलेला नाही, असे सांगितले.
'काही लाभार्थ्यांना लाभ मिळतं आणि आम्हाला का नाही, याची विचार करण्यासाठी आम्ही सर्व महिला वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर आलो आहे. इथं आम्ही आमच्या आधारकार्ड दिले आहेत, त्यावेळेस पुन्हा आम्हाला ई-केवायसी चुकल्याचं सांगण्यात आला आहे. माझ्यासारखी काहीशी सुशिक्षित महिला ई-केवायसी करतील. परंतु अशिक्षित लाभार्थी महिलांचं काय? लाडकी बहीण योजना सरसकट चालू ठेवा, नाहीतर बंद करा,' अशा कडक शब्दात लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी रूपाली महाजन यांनी सुनावलं.
योजनेचा लाभ न मिळाल्या रूपाली केंडे म्हणतात, 'मी दहाव्या महिन्यामध्ये योजनेसाठी ई-केवायसी केली. परंतु माझ्या दोन महिन्यांचा लाभाचा हप्ता मिळालेला नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यावर सांगतात की, तुमची ई-केवायसी चुकलेली आहे. परंतु मला ई-केवायसी सक्सेस झाल्याचा मेसेज आलेला आहे. जिल्हा प्रशासनाकडून आम्हाला योग्य प्रकारचे उत्तर मिळत नाही. महिला इथं ताटकळत उभे आहेत.'
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.