Akhil Bhartiy Marathi Sahitya Sanmelan : अखिल भारतीय मलाठी साहित्य संमेलनाला गालबोट लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी अचानक काही लोकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या लोकांनी वेगळ्या विदर्भा संदर्भात घोषणाबाजी करत मोठा गोंधळ घातला. पोलिसांनी या आंदोलकांना पकडून परिस्थिती नियंत्रणात आणली.
मिळालेल्या माहितीनुसार, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना वेगळा विदर्भ झाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, अशी सुद्धा ओरड या कार्यकर्त्यांनी केली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता.. काही काळासाठी या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
वर्धा येथे आजपासून (३ फेब्रुवारी) 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संमेलन अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर, स्वागतध्यक्ष दत्ता मेघे यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, मुंबई येथील साहित्य महामंडळाला सांस्कृतिक विभागाने ५० लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती समोर आली आहे. यातील २५ लाख रुपये नागपूर येथील विदर्भ साहित्य संघाला निधी म्हणून देण्यात आले आहेत. तर उर्वरित २५ लाख रुपये संमेलन सुरू होण्याआधी मिळणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रा. प्रदीप दाते यांनी काही दिवसांपुर्वी दिली होती. पण आता राज्य सरकारने पन्नास लाखांऐवजी २ कोटींचा निधी मंजूर केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.