Pimpri Bribery News : तरुणीच्या धाडसामुळे तहसीलदार कार्यालयातील लाचखोरीचा पर्दाफाश

तरुणीने आपल्या दोन लहान बहिणींचे जात प्रमाणपत्र घेण्यासाठी निगडी तहसीलदार कचेरीतील नागरी सुविधा केंद्रात अर्ज केला होता.
Pimpri Bribery News
Pimpri Bribery News Sarkarnama
Published on
Updated on

Bribery News : नागरिकांच्या सुविधेसाठी असलेली काही नागरी सुविधा केंद्रेच त्यांच्या असुविधेची केंद्रे बनली आहेत. कारण तेथे त्यांना अपेक्षित सुविधा मिळण्यासाठीही पैसे मोजावे लागत आहेत. त्याला गुरुवारी (२ फेब्रुवारी) पिंपरी-चिंचवड अपर तहसीलदार कार्यालयात असलेल्या नागरी सुविधा केंद्रातील लाचखोरीने दुजोरा मिळाला. एका तरुणीच्या धाडसामुळे ही लाचखोरी समोर आली आहे.

निगडी येथील या अपर तहसीलदार कार्यालयाविषयी मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. त्यातही विद्यार्थ्यांच्या शाळा, कॉलेज आणि व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशावेळी आवश्यक कागदपत्रे मिळविण्यासाठी दरवर्षी त्यांना आणि त्यांच्या पालकांना येथे मोठ्या दिव्यातून जावे लागते. वेळेत हे दस्त मिळून वेळेत प्रवेश घेण्याकरिता त्यांची अडवणूक केली जाते. त्यांच्याकडून पैसे घेतले जातात. त्याला काल दुजोरा मिळाला. एका तरुणीच्या धाडसामुळे तेथील लाचखोरी समोर आली. यापूर्वीही तेथे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) कारवाई झालेली आहे.

Pimpri Bribery News
Amravati Election News: धीरज लिंगाडे आघाडीवर, येथेही भाजपला बसेल फटका?

एसीबीकडील तक्रारदार २५ वर्षीय तरुणीने आपल्या दोन लहान बहिणींचे जात प्रमाणपत्र घेण्यासाठी निगडी तहसीलदार कचेरीतील नागरी सुविधा केंद्रात अर्ज केला होता. त्याचे रितसर शुल्क भरले होते. त्यावर कार्यवाही होऊन तहसीलदारांकडून ठराविक मुदतीत तो त्यांना मिळणे क्रमप्राप्त होते. पण, त्याअगोदर झारीतील शुक्राचार्य आडवे आले.

नागरी सुविधा केंद्राच्या डाटा एंट्री ऑपरेटर शैलेश अकांबरी बासूतकर (वय ४१) याने या अर्जावर कार्यवाही करून हा दाखला देण्यासाठी त्याने चार हजार रुपयांची लाच या तरुणीकडे मागितली. ती घेताना काल त्याला पकडण्यात आले. त्याबाबत निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com