काँग्रेस शहराध्यक्षांचे घरच बनले जुगार अड्डा; १४ जणांना अटक

अवधूतवाडी पोलिसांनी रविवारी रात्री गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकली.
Crime file photo
Crime file photosarkarnama
Published on
Updated on

यवतमाळ : काँग्रेसचे (Congress) यवतमाळ शहर अध्यक्ष चंद्रशेखर चौधरी यांच्या घरी जुगार (Gambling) भरविला जात होता. अवधूतवाडी पोलिसांनी रविवारी रात्री गुप्त माहितीच्या आधारे काँग्रेस शहराध्यक्ष धाड टाकून १४ जुगाऱ्यांना अटक केली.

Crime file photo
एमआयएम मुस्लिमांसाठी 'यम'च; काँग्रेस विरोधी प्रचारासाठी भाजपचा ओवैसी फॉर्म्युला

यवतमाळ नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे शहराध्यक्ष चंद्रशेखर चौधरी यांच्या घरी जुगार सुरु होता. पोलिसांनी मधुकर गावंडे (रा. अंबानगर, ता नेर) सुभाष वानखेडे (रा. अंबानगर), दीपक थोरात (रा. दारव्हा रोड), विजय सुरस्कर (रा. जयविजय चौक), उमेश उपाध्ये (रा. देवीनगर), श्रीकांत बावणे (रा. साईनगर), राजबहाद्दूर राजपूत (रा. शारदा चौक), अल्पेश फुलझेले (रा. उमरसरा), शेख हकीम शेख करीम (रा. गिलाणीनगर), नितीन चव्हाण (रा. कावेरी पार्क), दर्शन रमेश कोठारी (रा. दाते कॅालेज चौक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

Crime file photo
देगलूर पोटनिवडणूकीसाठी कॉंग्रेसकडून जितेश अंतापूरकरांना उमेदवारी जाहीर

पोलिसांनी या जुगार अड्यावर धाड टाकून तेथून दोन लाख १५ हजार ८७० रुपये रोख, १४ मोबईल, आठ मोटारसायकली असा सहा लाख ८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ५, ४ मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॅा. दिलीप पाटील-भुजबळ, अप्पर अधीक्षक खंडेराव धरणे, ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नागेश खाडे, संजय राठोड, गजानन दुधकोहळे, कुणाल पांडे, सागर चिरडे, समाधान कांबळे, प्रकाश चरडे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com