Nagpur Riots Update : शांततेसाठी मोठे पाऊल, काँग्रेसची समिती करणार नागपूरच्या दंगलग्रस्त भागाची पाहणी!

Congress committee to inspect riot-hit areas : विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने केलेल्या आंदोलनामुळे नागपूरमध्ये हिंसक वळण लागल्याचा आरोप केला जात आहे. दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी जाणीपूर्वक दगडफेक, तोडफोड करून दंगल घडवण्यात आला असल्याचा आरोप केला आहे.
Congress
Congresssarkarnama
Published on
Updated on

Congress News : औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये दंगली उसळलेली होती. पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले आहेत. याकरिता बांगला देशातून चिथावणी देण्यात आली असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी 1200 लोकांवर गुन्हे दाखल केले आहे. दंगलीचा 'मास्टर माईंड' फहीम खान याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने केलेल्या आंदोलनामुळे नागपूरमध्ये हिंसक वळण लागल्याचा आरोप केला जात आहे. दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी जाणीपूर्वक दगडफेक, तोडफोड करून दंगल घडवण्यात आला असल्याचा आरोप केला आहे. भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी मुद्दामच हिंदून टार्गेट केले असल्याचे सांगून दंगेखोरांनी हिंदू समाजाच्या गाड्या जाळल्याचा आरोप केला आहे. हे बघता यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी होणार असल्याचे दिसून येते.

Congress
Ambadas Danve-Girish Mahajan News : सत्तेचा माज तुमच्या आकासमोर दाखवा! मंत्री गिरीश महाजन यांना अंबादास दानवेंनी सुनावले

सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे. नागपूरच्या दंगलीचे पडसाद अधिवेशनात पडले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरमध्ये जे काही घडले याची सविस्तर माहिती सभागृहात दिली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात झालेल्या दंगलग्रस्त भागाची पाहणी करून स्थानिकांशी चर्चा करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

माजी प्रांताध्यक्ष, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, ॲड. यशोमती ठाकूर, आ. साजिद पठाण हे या समितीचे सदस्य असून नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे हे निमंत्रक तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडधे पाटील समन्वय आहेत. काँग्रेसची ही समिती दंगलग्रस्त भागात जाऊन परिस्थितीची पाहणी करून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार आहे.

Congress
Maharashtra Bhushan Award : मोठी बातमी! ज्येष्ठ शिल्पकार राम सुतारांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com