Ashish Deshmukh : काँग्रेस पक्षाविरोधी कारवाईबाबत आशिष देशमुख म्हणाले, ‘साडेतीन तास चाललेल्या बैठकीत...’

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल करण्यासाठी खोडा टाकत आहेत.
Ashish Deshmukh
Ashish DeshmukhSarkarnama

मुंबई : मी पक्षविरोधी बोलत असल्याचे काँग्रेसच्या (Congress) शिस्तपालन समितीला आढळले नसल्यामुळे मला अद्यापही त्यांच्याकडून नोटीस आलेली नाही, असे काँग्रेस नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी स्पष्ट केले. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल करण्यासाठी खोडा टाकत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. (Congress disciplinary committee did not find any evidence against me : Ashish Deshmukh)

पक्षविरोधी वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसच्या शिस्तपालन समितीकडून आशिष देशमुख यांना नोटीस देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, देशमुख यांनी त्याचा इन्कार केला आहे. ते म्हणाले की, शिस्तपालन समितीची बैठक झाली आहे. पण त्यांची नोटीस अद्याप माझ्यापर्यंत आलेली नाही. तीन ते साडेतीन तास चालेल्या या बैठकीत माझ्याविरोधातील एकही पुरावा त्यांच्याकडे नसावा. त्यामुळे नोटीस माझ्यापर्यंत आलेली नाही.

Ashish Deshmukh
Maharashtra-Karnataka Border Dispute : कर्नाटकचे मुख्यमंत्री पुन्हा बरळले : ‘जनआरोग्य योजना मागे घ्या; अन्यथा...’

मी आजपर्यंत जी जी भूमिका घेतली आहे. मी जे वक्तव्य केले आहे, ते पक्षाच्या हिताचे आहे, एवढं मी नक्की सांगतो. दिल्लीहून आलेले प्रदेशाध्यक्ष म्हणतात की राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची सभा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात होत आहे. महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा १६ तारखेला नागपूरला होते आहे, त्यात खोडा टाकून काँग्रेस पक्षाची एकट्याची सभा घेण्यात काय अर्थ आहे, असा सवालही देशमुख यांनी उपस्थित केला.

Ashish Deshmukh
Election News : लोकसभेपूर्वी होणार महापालिका, झेडपी, पंचायत समितींच्या निवडणुका? : प्रशासकराजचा सर्वाधिक लाभ भाजपला

वास्तविक राहुल गांधी हे १६ तारखेलाही उपलब्ध होते. मात्र, त्यांची दुसरी सभा ठेवत महाविकास आघाडीची वज्रमूठ आणखी घट्ट होऊ पाहते आहे. त्याला तोडण्याचे काम खोक्यांच्या माध्यमातून होते आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल करण्यासाठी खोडा टाकत आहेत. त्यांना खोका मिळत असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com