Congress, Shivsena UBT
Congress, Shivsena UBTSarkrnama

Buldhana Politics : काँग्रेसच्या नेत्याचं विधान अन् ठाकरे गटातील नेत्यांच्या तोंडचं पाणी पळालं!

Mahavikash Aghadi : नितीन देशमुखांकडून काँग्रेसच्या नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न
Published on

Buldhana Political News : राज्यातील अनेक लोकसभा जागांवरील उमेदावर ठरले आहेत. उमेदवार ठरताच काही ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीत धूसफूस सुरू झाली. बुलढाण्यात काँग्रेस नेते, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ इच्छुक होते. मात्र बुलढाण्यात ठाकरे गटाकडून प्रा.नरेंद्र खेडेकर (Narendra Khedekar) यांना उमेदवारी देण्यात आली. या पार्श्वभूमिवर सपकाळांनी असे विधान केले की त्यामुळे ठाकरे गटाचे नेते, आमदार नितीन देशमुखांनी थेट बुलढाण्यातील काँग्रेस ऑफिस गाठले. Buldhana Politics

बुलढाण्यातील महाविकास आघाडीचा उमेदवार ठरल्यानंतर सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी रविवारी (ता. 31) एक ट्विट करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. हर्षवर्धन सपकाळांनी "राज्यात अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत तर बुलढाण्यात काय..?" असे ट्विट केले. निवडणुकीच्या तोंडावर बुलढाणा काँग्रेसने जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्याने महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे नेत्यांच्या तोंडचे पाणी पळाल्याचे दिसून आहे. परिणामी आघाडीत बिघाडी झाली का, अशी चर्चा सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Congress, Shivsena UBT
Nashik Lok Sabha Constituency : शिंदे गट इरेला पेटला! नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शेवटपर्यंत लढणार

महाविकास आघाडीकडून बुलढाणा लोकसभा (Buldhana) मतदारसंघासाठी ठाकरे गटाचे प्रा.नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी जाहीर झाली. खेडेकर यांच्या संपर्कात बुलढाण्यातील काँग्रेसचे नेते नसल्याने आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. त्यात सपकाळांनी केलेल्या विधानामुळे ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) थेट बुलढाण्यातील काँग्रेसच्या ऑफिसमध्ये दाखल झाले.

देशमुखांनी बुलढाणा जिल्हा काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून त्यांची मनधरणी केल्याची माहिती आहे. जिल्हा आघाडीत कुठलीही बिघाडी नसल्याचे देशमुखांनी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर स्पष्ट केले. मात्र हर्षवर्धन सपकाळ यांच्या ट्विटमुळे बुलढाण्यात सर्व काही अलबेल नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, हर्षवर्धन सपकाळांचे मत जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. ते छत्तीसगडमध्ये असून त्यांचा मोबाईल बंद आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Congress, Shivsena UBT
Lok Sabha Election 2024 : 'वेळ आली तर आम्ही धनुष्यबाणावर लढू, पण..' ; हिंगोली भाजपा नेत्यांची महायुतीकडे मागणी!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com