Nashik Lok Sabha Constituency : शिंदे गट इरेला पेटला! नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शेवटपर्यंत लढणार

Sanjay Shirsat On Hemant Godse : राज्यातील जागांबाबत केंद्रातून कुणीही कुणाच्या नावाचा प्रस्तावर देत नाही, म्हणत शिरसाटांनी भुजबळांवर निशाणा साधला.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : महायुतीत बहुतांश जागांवरचे उमेदवार ठरले असले तरी काही जागांवरील दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. ठाणे, कल्याण, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, रात्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघातील उमेदवार अद्याप ठरले नाहीत. येथील निवडणूक नंतरच्या टप्प्यात असल्याने योग्य वेळी निर्णय घेतला जाणार असे शिंदे गटाकडूने एकीकडे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे नाशिकवरील दावा आम्ही कसल्याही परिस्थितीत सोडणार नाही, असा दावाही शिवसेनेकडून केला जात आहे. Nashik Lok Sabha Constituency

नाशिक जागेबाबत महायुतीत मोठा तिढा निर्माण झालेला आहे. येथे शिवसेना शिंदे गटाचे सिटिंग खासदार आहेत. तर दुसरीकडे या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादीनेही दावा केला आहे. त्यातच साताऱ्याच्या बदल्यात नाशिक या चर्चेने तर शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झालेली आहे. ही जागा आपल्याकडेच ठेवा, असे खासदार हेमंत गोडसेंनी (Hemant Godse) वारंवार भेटून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे म्हटले आहे. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी नाशिकची जागा कसल्याही स्थितीत शिवसेनेकडेच राहणार असल्याचे ठासून सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde
Sunetra Pawar News : 'मोदी विकासपुरुष, तर अजितदादा विकासाचे पाईक!'

संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, नाशिकची जागा ही शिवसेनेचीच आहे. येथून दोनवेळा शिवसेनेचा खासदार राहिला आहे. हेमंत गोडसे यांनी तेथून विरोधी उमेदवारांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. दुसऱ्यावेळी त्यांनी आपले मताधिक्य वाढवले आहे. ते पहिल्यांदा दोन लाखांनी तर दुसऱ्यावेळी दोन लाख 90हजार मतांनी निवडून आले आहेत. त्यामुळे आम्ही सर्वांनीच मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे नाशिकचा आग्रह धरला आहे. ही जागा न सोडण्याची भूमिका मांडली आहे, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) केंद्रीय स्तरातून माझ्या नावाचा प्रस्ताव आल्याचा दावा केला आहे. त्यावर छेडले असता शिरसाट यांनी भुजबळांचा दावा एका वाक्यात उडवून लावला. ते म्हणाले, केंद्रातून असा कुणीही कुणाच्या नावाचा प्रस्ताव देत नसते. राज्यातील सर्व जागांचे निर्णय हे मुंबईत बसून महायुतीतील नेते घेत असतात. नाशिकची भौगोलिक, राजकीय स्थिती पाहता ही जागा शिवसेनेलाच मिळेल, असा विश्वासही शिरसाट यांनी व्यक्त केला.

(Edited by Sunil Dhumal)

Eknath Shinde
Prakash Ambedkar On MVA Alliance : 'वंचित'चा 'एकला चलो'चा नारा; महाविकास आघाडीसोबत समझोता नाहीच!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com