
Maharashtra Congress BJP clash : पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्करानं 'ऑपरेशन सिंदूर' राबवत जोरदार प्रत्युत्तर दिलं. पाकिस्ताननं यानंतर भारतावर ड्रोन हल्ले केले. भारतीय लष्करानं पाकिस्तानचे हे ड्रोन हल्ले हवेतच निष्प्रभ केले. भारतीय लष्कराच्या या अभिमानस्पद कामगिरीचं संपूर्ण देशात कौतुक होत आहे.
सत्ताधारी भाजपबरोबर विरोधक काँग्रेस देखील भारतीय लष्कराच्या कौतुकात देशभर रॅली काढत आहेत. भाजप अन् काँग्रेस भारतीय लष्कराचं कौतुक करत असताना, एकमेकांच्या नेत्यांना टार्गेट करत आहेत. नंदुरबारचे काँग्रेस माजी आमदार के. सी. पाडवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केली.
माजी आमदार के. सी. पाडवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना, 'डरपोक', 'खुनी माणूस', 'गद्दार', असे शब्द वापरले. पाडवी यांचे हे शब्द आता काँग्रेसला (Congress) अडचणीचे ठरू शकतात. भाजपच्या नेतृत्वावर वैयक्तिक टीका केल्यावर आतापर्यंत काँग्रेसचा अडचणी ठरली आहे. पाडवी यांनी केलेली ही जहरी टीका देखील काँग्रेसला अडचणी ठरू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
के. सी. पाडवी यांनी पंतप्रधान मोदींवर (Narendra Modi) टीका करताना, डरपोक आणि देशाला विकणारा पंतप्रधान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हा खुनी माणूस आहे, लोकांच्या जीव जातो आणि पंतप्रधानांना मजा येते. पहलगाम इथं झालेला दहशतवादी हल्ला संशयास्पद असल्याचं वाटतं, असे म्हटले.
काँग्रेसचे पाडवी यांनी या दहशतवादी हल्ला ज्यावेळेस पर्यटकांवर झाला, त्यावेळेस तिथली सुरक्षा व्यवस्था कुठे होती, असा सवाल केला. या दहशतीवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती झाली. हे युद्ध थांबवण्यासाठी दुसऱ्यांच्या मध्यस्थीची गरज का? घ्यावा लागली, असा सवाल देखील केला.
युद्धामुळे अदानी, अंबानीच्या अड्ड्यांच्या नुकसान झालं. त्यामुळे युद्ध थांबवण्यासाठी विनंती केली. सर्व आतंकवादी पळून गेल्यानंतर पाकिस्तानात हल्ला केला. युद्धाचा प्रचारासाठी सरकार वापरत असल्याचा आरोप के. सी. पाडवी यांनी केला.
2019 ची लोकसभा जिंकण्यासाठी भाजपने त्याच्याच वापर केला. आजही तिरंगा रॅली काढून बिहार आणि इतर राज्य निवडणूक जिंकण्यासाठी काढत आहेत. नरेंद्र मोदी हा गद्दार असून देशासोबत गद्दारी करत आहे, असा गंभीर आरोप करताना, पहलगाममध्ये मृत्युमुखी पावलेल्या पर्यटकांच्या घरी जाण्यासाठी पंतप्रधानांना वेळ नाही. परंतु हिरो आणि हिरोईन यांना भेटण्यासाठी वेळ आहे, असा घणाघात देखील के. सी. पाडवी यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.