Nagpur Vijay Wadettiwar : लाचारीपोटी कुणी कुणाला गांधींची उपाधी देऊ शकत नाही

Jagdeep Dhankhar : विजय वडेट्टीवार यांची उपराष्ट्रपतींच्या वक्तव्यावर टीका
Vijay Wadettiwar, Narendra Modi & Jagdeep Dhankhar.
Vijay Wadettiwar, Narendra Modi & Jagdeep Dhankhar.Google

Statement On Mahatma Gandhi :महात्मा गांधी यांना आपण बापू, राष्ट्रपिता म्हणतो. महात्मा, राष्ट्रपिता ही उपाधी त्यांना जनतेनं दिलेली आहे. ही उपाधी त्यांनी स्वतः आपल्या नावामागं लावून घेतलेली नाही. या देशात दुसरा महात्मा, राष्ट्रपिता होऊ शकत नाही. ते केवळ महात्मा गांधीच होऊ शकतात. कुणाला कुणाची हुजरेगिरी, लाचारी, लाळघोटेपणा करायचा असेल तर त्यांनी करावा, पण अशा उपाधी कुणाच्या नावाला लाऊ नयेत,’ अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना महात्मा गांधी यांच्याशी केली. त्यावर मंगळवारी (ता. 28) नागपूर येथे बोलताना विजय वडेट्टीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. (Congress Leader MLA Vijay Wadettiwar Criticized Vice President Of India At Nagpur Jagdeep Dhankhar For Comparing PM Narendra Modi With Mahatma Gandhi)

Vijay Wadettiwar, Narendra Modi & Jagdeep Dhankhar.
Nagpur Vijay Wadettiwar : सरकारच्या इभ्रतीचे वाभाडे निघत आहेत

विदर्भाचा दौरा करणार

अवकाळी पावसानं विदर्भातील शेतकऱ्यांचं उरलंसुरलं पीक उद्ध्वस्त केलं आहे. त्यामुळं 2 डिसेंबरपासून विदर्भाचा दौरा करणार असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं. यवतमाळमधून दौरा सुरू करणार आहे. ते जालना, वाशीम येथेही जाणार आहेत. शेतात जात प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा लावून धरणार आहे.

राज्यातील 40 तालुके वगळता नव्यानं एक हजार मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्याला केंद्र सरकारची मदत मिळू शकत नाही. सरकारनं उपसमितीची बैठक न घेतल्यामुळं ही परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या तिजोरीत द्यायला पैसे नाही, असा घणाघातही त्यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकारवर लक्ष

मराठा आरक्षण आणि ओबीसी यासंदर्भात कोण काय म्हणतं, यापेक्षा सरकार काय करतं यावर लक्ष आहे. सरकारनं कुणाला काय आश्वासित केलय हे महत्त्वाचं आहे. सरकारच्या भूमिकेकडं नजर आहे. आपल्या भाषणादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी वापरलेला शब्द जर मागे घेतला असेल तर अशी सद्बुद्धी त्यांना मिळो. त्यांच्या मुखातून असे कुठलेही अपशब्द येऊ नये. कोणत्याही समाजात तेढ निर्माण होऊ नये, गुण्यागोविंदानं सर्वांनी राहावं, त्यांच्या हक्काचं त्यांना मिळावं, तो शब्दमागे घेतल्याबद्दल जरांगे पाटलांना धन्यवाद देतो, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.

शिंदे समितीबाबत अजब प्रकार

न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीबाबत हास्यास्पद प्रकार सुरू आहे. राज्यातला एक मंत्री शिंदे समिती बरखास्त करा म्हणतो आणि सरकार त्यांचं ऐकत नाही, अशी स्थिती आहे. एकाच घरात राहणारे एकमेकांशी भांडण्याचा हा प्रकार दिसतो. समिती बरखास्त करावी की नाही हे आम्ही विधिमंडळाच्या अधिवेशनात मांडू. शिंदे समिती गठीत झाली तेव्हाच मंत्री म्हणून भुजबळ यांनी भूमिका स्पष्टपणे मांडायला हवी होती. त्यांच्या मागणीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किती दाद देतात हे बघण्यासारखं आहे.

Edited by : Atul Mehere

Vijay Wadettiwar, Narendra Modi & Jagdeep Dhankhar.
Nagpur NDCC Bank : माजी मंत्री सुनील केदार मुख्य आरोपी असलेल्या खटल्याचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com