Nana Patole : ‘समृद्धी’ला शिंदे-फडणवीसांच्या भ्रष्टाचाराचे भगदाड

Samruddhi Highway : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचा आरोप. वडेट्टीवार यांच्यानंतर काँग्रेसचा दुसरा प्रहार
Samruddhi Highway
Samruddhi HighwaySarkarnama
Published on
Updated on

Nana Patole : समृद्धी महामार्गावर खड्डे पडल्यानंतर विरोधकांकडून राज्य सरकारवर आरोप करण्यात येत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी यावरून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबई ते नागपूर 700 किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाचा शिंदे-फडणवीस सरकारने मोठा गाजावाजा केला. जाहिरातबाजी करून पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटनही केले. 12 तासांत मुंबईहून नागपूरला पोहाेचणार असा दावा करणाऱ्या महामार्गाचेच 12 वाजले आहेत. समृद्धी महामार्ग पहिल्यापासूनच वादग्रस्त ठरला आहे. सातत्याने होत असलेल्या अपघाताचा प्रश्न असताना आता या महामार्गावरील एका पुलाला मोठा खड्डा पडला आहे. पुलावरील खड्ड्यांमुळे समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह तर निर्माण झाले आहे. पुलावर पडलेला हा केवळ खड्डा नसून ‘समृद्धी’ला शिंदे-फडणवीसांच्या भ्रष्टाचाराचे पडलेले हे भगदाड आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यातील लोहोगावजवळच्या पुलाला खड्डा पडल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. अवघ्या 14 महिन्यांतच पुलावर भला मोठा खड्डा पडल्याने या रस्त्याच्या बांधकामाचा दर्जा चांगला नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. समृद्धी महामार्गाच्या आराखड्यात व बांधकामात त्रुटी असल्याच्या तक्रारी करण्यात येत होत्या, परंतु त्याकडे दुर्लक्ष केले गेले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Samruddhi Highway
Vijay Wadettiwar : गाजावाजा करून सुरू केलेल्या महामार्गावरील खड्डेच सांगताहेत त्याची ‘समृद्धी’

नागपूर-मुंबई समृद्धी हा 55 हजार कोटी रुपयांचा महामार्ग सुरुवातीपासूनच भ्रष्टाचाराचे कुरण ठरला आहे. महामार्गासाठी जमीन संपादन करताना मोठा भ्रष्टाचार झाला. या महामार्गाच्या तांत्रिक बाबीमध्येही गडबड आहे. समृद्धी महामार्गाच्या आराखड्यासाठी तज्ज्ञांच्या विशेष पथकाला हजारो कोटी रुपये दिले, पण अपघाताचे प्रमाण पाहता रस्ते बांधणी करताना फारशी काळजी घेतल्याचे दिसत नाही, असे नाना पटोले म्हणाले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आणि एक्स्प्रेस-वेसाठी निश्चित केलेले नियम पाळलेले नाहीत. रोड हिप्नाॅसिसमुळे अपघात होतात असे काही काही तज्ज्ञांनी सांगितले आहे, त्यावर काही उपाय केलेले नाहीत. महामार्गावर ठराविक अंतरावर चहापाणी, हाॅटेल आणि स्वच्छतागृहे उपलब्ध नाहीत. त्यात आता रस्त्याला भगदाड पडल्याने या महार्गाने कोणाची ‘समृद्धी’ केली हे दिसत आहे, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला. ‘समृद्धी’च्या मुद्द्यावरून आता काँग्रेस सरकारविरुद्ध चांगलीच आक्रमक झाली आहे. समृद्धी महामार्गाच्या मुद्द्यावरून गेल्या अनेक दिवसांपासून सरकारची चिंता वाढली आहे. या महामार्गावर अनेक दिवसांपासून अपघात घडत आहेत. अशातच आता महामार्गाला खड्डा पडल्याने सरकारला कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न चालविले आहेत.

Edited By : Prasannaa Jakate

R

Samruddhi Highway
Samruddhi Highway : देवेंद्र फडणवीस यांनी विकायला काढला समृद्धी महामार्ग ! पण का ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com