Medigadda Dam : तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरून राहुल गांधी बरसले, मेडीगड्डाला केसीआरचे एटीएम संबोधले

Random Inspection Tour : गडचिरोलीतील प्रकल्पाला दिली अचानक भेट
Rahul Gandhi and Medigadda Dam
Rahul Gandhi and Medigadda DamGoogle
Published on
Updated on

Rahul Gandhi in Gadchiroli : तेलंगणासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी अचानक महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील मेडीगड्डा धरण परिसरात दाखल झालेत. प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर प्रकल्पाला पडलेल्या भेगा पाहून राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला. याच मुद्द्यावरून राहुल यांनी कालेश्वरम धरणाबाबतही नाराजी व्यक्त केली. हे दोन्ही प्रकल्प म्हणजे के. चंद्रशेखर राव यांचे ‘एटीएम’ असल्याची टीकाही त्यांनी केली.

केसीआर (के. चंद्रशेखरराव) यांनी या प्रकल्पांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला, असा आरोपही राहुल यांनी या वेळी केला. आंबटपल्ली गावात आयोजित जाहीर सभेत राहुल गांधी यांनी केसीआर यांच्यावर थेट शाब्दिक हल्ला चढवला. मेडीगड्डा धरणाचा फटका महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याला जबरदस्त पद्धतीनं बसतोय, परंतु यातून केसीआर यांची चांगलीच कमाई झाली, असं ते म्हणाले. (Congress leader Rahul Gandhi's surprise visit to Medigadda in Gadchiroli Criticise Telangana CM K Chandrashekhara Rao)

महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर तेलंगणा सरकारने कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प उभारला आहे. मेडीगड्डा धरण हा या प्रकल्पाचा एक भाग आहे. मेडीगड्डा धरणाला तडे गेले आहेत. त्यामुळं सीमावर्ती भागात तणाव निर्माण झाला आहे. सध्या तेलंगणा राज्यात निवडणूक होत आहे. अशा स्थितीत मेडीगड्डा धरणाच्या कामावरून केसीआर ‘बॅकफूट’वर आहेत. त्यांना याबाबत तेलंगणामध्ये चांगलाच विरोध सहन करावा लागत आहे. काँग्रेस हा मुद्दा ‘कॅश’ करण्याचा प्रयत्न करतेय. त्यामुळंच राहुल गांधी यांनी आधी गडचिरोलीत या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली व नंतर त्यावर वक्तव्य केलं.

राहुल गांधी यांच्या गडचिरोली दौऱ्याबाबत कमालीची गोपनियता बाळगण्यात आली होती. गुरुवारी (ता. २) राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टर गडचिरोतील मेडीगड्डा परिसरात दाखल झालं. महाराष्ट्र-तेलंगणच्या सीमावर्ती भागात असलेल्या भुपलपल्ली, आंबटपल्ली गावात त्यांनी जाहीर सभा घेतली. केसीआर हेच राहुल गांधी यांचं लक्ष्य होते. केसीआर यांनी शेतकऱ्यांच्या नावाखाली हा प्रकल्प उभारला. परंतु त्यातून तेलंगणामधील शेतीला कोणताही फायदा होत नाही. उलट महाराष्ट्रातील गावंही पाण्याखाली बुडाली आहेत, असं राहुल यांनी नमूद केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मेडीगड्डा प्रकल्पासाठी महाराष्ट्रानं परवानगी दिली. त्यामुळं धरणाच्या ‘बॅकवॉटर’मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावं बुडाली आहेत. अलीकडच्या पावसाळ्यात मेडीगड्डा प्रकल्पामुळं गडचिरोली जिल्ह्याला पुराचा मोठा फटकाही बसलाय. त्यामुळं हा प्रकल्प महाराष्ट्र व तेलंगण दोन्ही राज्यांत वादाचा विषय ठरतोय. सुरुवातीपासूनच या प्रकल्पामुळं महाराष्ट्र भाजपवर टीका होतेय.

राहुल यांना पाहण्यासाठी गर्दी

राहुल गांधी महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील आंबटपल्ली येथे आल्याची माहिती कळताच गडचिरोली जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील नागरिकांनी त्यांना बघण्यासाठी चांगलीच गर्दी केली. राहुल आल्यानं काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केला; पण सुरक्षेच्या कारणांमुळे साऱ्यांनाच प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळंही कार्यकर्ते व पोलिसांमध्ये वाद झाला.

काँग्रेसची जोरदार बॅटिंग

तेलंगणामध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पूर्ण ताकदीनं मैदानात उतरली आहे. यंदा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस ‘फुल फार्म’मध्ये ‘बॅटिंग’ करताना दिसत आहे. निवडणूक तेलंगणात आहे, परंतु राजकीय धुरळा महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातही बघायला मिळत आहे. महाराष्ट्रातील सीमावर्ती गावांमध्ये काँग्रेस आतापासूनच आपली पाळंमुळं पुन्हा घट्ट करू पाहतेय.

(Edited By : Prasannaa Jakate)

Rahul Gandhi and Medigadda Dam
Gadchiroli Nitish Kumar News : महाराष्ट्र सरकारला लाजवतोय गडचिरोलीतील नितीश कुमारांच्या अभिनंदनाचा फलक !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com