Vijay Wadettiwar News: '' काँग्रेसच्या नेत्यांनी जीभेवर संयम ठेवावा..''; वडेट्टीवारांच्या टीकेचा रोख पटोलेंवर...?

Vijay Wadettiwar's criticism on Nana Patole: '' तोडण्याची भाषा कुणीही करु नये, जोडण्याची भाषा करावी...''
Vijay Wadettiwar News
Vijay Wadettiwar NewsSarkarnama

Congress Political News: महाविकास आघाडी भक्कम आहे असा दावा राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, तरीदेखील आघाडीत सारं काही आलबेल नसल्याचं लपून राहिलेलं नाही.गेल्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री, मतदारसंघावरील दावे प्रतिदावे, जागा वाटप,नेत्यांच्या पक्षप्रवेश यावरुन आघाडीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. याचवेळी माजी मंत्री व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील पक्षाच्या नेत्यांनी संयमानं बोलावं असा सल्ला दिला आहे.

एकीकडे काँग्रेस(Congress)मधील इतर नेते महाविकास आघाडीबाबत संयमी आणि अनुकूल भूमिका घेत संयमी प्रतिक्रिया देत असतानाच मागील काही दिवसांपासून नाना पटोले यांनी महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि राष्ट्रवादीबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच मुख्यमंत्रीपदावरील दावे आणि महाड, सोलापूरच्या जागेवरुन ठाकरे गट आणि राष्ट्रवादीवर स्पष्ट मत नोंदवलं होतं. यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Vijay Wadettiwar News
MP Shrikant Shinde : सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले पुढारी कंत्राटदाराची भाषा बोलत आहेत !

महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत नाना पटोले(Nana Patole) व विजय वडेट्टीवार यांच्यातला संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. याच पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांना महत्वपूर्ण सल्ला देतानाच चिमटाही काढला आहे.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्याच्या राजकारणातील टीका टिपण्णीवर भाष्य केलं आहे. वडेट्टीवार म्हणाले, आमच्या सगळ्याच नेत्यांनी जिभेवर संयम ठेवायला हवा. आणि आघाडी मजबूत होण्यासाठी प्रयत्न करायला हवा. म्हणून आता कुणीही तोडण्याची भाषा कुणीही करु नये जोडण्याची भाषा करावी असाही टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे. शब्दाला आणि लिहिण्याला मर्यादा असाव्यात असंही ते म्हणाले.

Vijay Wadettiwar News
Sharad Pawar on BJP : हा तर 'त्या' शपथेचा भंग...; पवारांनी भाजपला करुन दिली 'त्या' शपथेची आठवण

स्वबळावर सत्ता ताकद कुणातही नाही...

सध्या स्वत: च्या भरवशावर राज्यात सत्ता आणण्याची ताकद कुणाचीही नाही. भाजप,काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यापैकी कोणत्याही पक्षामध्ये राज्यात सध्या स्वबळावर सत्ता आणण्याची ताकद नाही. त्यामुळे निवडणुका या तडजोडीनेच लढवाव्या लागतात असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com