MP Shrikant Shinde News: सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले पुढारी कंत्राटदाराची भाषा बोलत आहेत !

Vidarbha News: विदर्भाला जास्तीत जास्त निधी देण्याचं काम सरकारने केलं.
Shrikant Shinde and Aditya Thackeray.
Shrikant Shinde and Aditya Thackeray.Sarkarnama

MP Shrikant Shinde on Bhandara Tour : मुख्यमंत्री यांचं लक्ष संपूर्ण महाराष्ट्रावर आहे. राज्याचा कुठलाही भाग वंचित राहणार नाही. साडेतीनशे कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन भंडारा येथे आज होणार आहेत. विदर्भाला जास्तीत जास्त निधी देण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे, असे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले. (The government was truly voted by the people)

भंडारा येथे आज (ता. ९) विविध विकास कामांचे भूमिपूजन होत आहे. तेथे जाण्यासाठी नागपूर विमानतळावर आले असता खासदार शिंदे पत्रकारांशी बोलत होते. राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षावरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, लोकांना पाहिजे असलेल्या सरकारला खऱ्या अर्थाने जनतेने कौल दिला होता.

हे सरकार १० महिने अगोदर सत्तेत आलं. जवळपास साडेबारा हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा झाली. त्यामुळे सर्वांना आपला मुख्यमंत्री असल्याचं जाणवत आहे आणि हे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात आहे. जिथं जातो तिथं लोक स्वागत करतात. राज्यात खुशाली असल्याचे हो द्योतक आहे, असे खासदार शिंदे म्हणाले.

टीकेची भाषा घसरली..

हल्ली टीका करण्याचा स्तर घसरलेला असून महाराष्ट्राच्या संस्कृतीला प्रदूषित करण्याचं काम सध्या सुरू आहे. सकाळपासून शिव्या शाप देण्याचं काम विरोधकांकडून सुरू आहे. महाराष्ट्राने यापूर्वी अशा पद्धतीच्या टिका पाहिल्या वा ऐकल्या नाहीत. आता मात्र आपसातच एकमेकांवर टीका होताना दिसून येत आहे. सत्तेसाठी विचारांना बाजूला करून ते एकत्र आले आहेत. वज्रमूठ एकजूट दाखवत आहे, ती वज्रमूठ राहते की वज्रझूठ ठरते हे पाहावे लागणार आहे.

Shrikant Shinde and Aditya Thackeray.
Shrikant Shinde News : निवडणूक येऊ तर द्या...आम्ही पण तयार आहोत; श्रीकांत शिंदेंचे उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर

सत्तासंघर्षात न्यायालयाचा निकाल आमच्या म्हणजेच सत्याचा बाजूने लागेल. आज बहुमत आमच्याकडे आहे. त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखायला लागलं आहे. काही नेते तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले. संघर्ष काय असतो, हे त्यांना माहिती नाही. असे नेते कंत्राटदाराची भाषा बोलत असल्याची टिका त्यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता केली.

पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच (NCP) असेल, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली. याबाबत विचारले असता, सगळ्यांना स्वप्न बघण्याचा अधिकार आहे. लोक दिवसा स्वप्न पाहतात, त्यावर काय बोलायचे. आम्ही त्यावर भाष्य करणार नाही, असे खासदार शिंदे (Shrikant Shinde) म्हणाले.

Shrikant Shinde and Aditya Thackeray.
Nagpur Refinery : पेट्रोकेमिकल रिफायनरीला बारसूत विरोध, पण नागपुरात होण्याची शक्यता !

शिवसेना (Shivsena) नेते अनिल परब (Anil Parab) यांचे नाव ईडीच्या आरोपपत्रात नाही. त्यामुळे तूर्तास तरी त्यांना दिलासा मिळाला आहे. याबाबत विचारले असता, साई रिसॉर्ट प्रकरणाची सद्यःस्थिती मला माहिती नाही. त्यामुळे त्यावर बोलणार नाही, असेही ते म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com