Congress MLA aggressive : अवैध धंद्यांचे पैसे जातात गृहखात्याकडे, काँग्रेसच्या आमदाराचा खळबळजनक आरोप !

Buldhana Police : पोलिस विभागाला एक लाख रुपये हप्ता जात असून, तो पैसा गृहखात्याला पुरवला जातो.
Dheeraj Lingade and others
Dheeraj Lingade and othersSarkarnama

Buldhana Political News : बुलडाणा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. शहरात गांजा विक्री, सट्टा व्यवसाय याव्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात देहविक्री व्यवसायही सुरू आहे. यामधून पोलिस विभागाला एक लाख रुपये हप्ता जात असून, तो पैसा गृह खात्याला पुरवला जातो, असा खळबळजनक आरोप अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे यांनी केला. (An installment of one lakh rupees is being paid and that money is provided to the Home Department)

बुलडाणा येथे आज (ता. २८) महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार लिंगाडे बोलत होते. या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष जयश्री शेळके, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक नरेंद्र खेडेकर यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.

आमदार लिंगाडे म्हणाले की, बुलडाणा शहरात पोलिसांच्या आशीर्वादाने व लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे तरुण पिढी गांजाची व्यसनाधीन झाली आहे. शहरातील काही भागांत देहविक्रीचे व्यवसाय चालू आहेत. ही बाब महाविकास आघाडीच्या वतीने पोलिस प्रशासनाला लक्षात आणून देण्यात आली. मात्र, याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे.

यासाठी सत्तेत असणारे स्थानिक लोकप्रतिनिधींचे पाठबळ अवैध धंद्यांना व शहरातील चालू असणाऱ्या गुंडागिरीला मिळत आहे का? असा प्रश्नही त्यांनी या वेळी उपस्थित केला. शहरातील अवैध धंद्यांना तत्काळ आळा घालून गुन्हेगारांचा बंदोबस्त करावा यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने पोलिस प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.

जर आठ दिवसांत शहरातील अवैध धंदे बंद झाले नाहीत, तर महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हा पोलिस मुख्यालयापुढे मोठे आंदोलन केले जाईल, असा इशाराही या वेळी आमदार लिंगाडे यांनी दिला. अवैध धंद्यांचे पैसे गृहखात्याकडे जातात, हा आरोप करून आमदार धीरज लिंगाडे यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधल्याचे बोलले जात आहे. आमदार लिंगाडेंच्या या वक्तव्याचे काय परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणात होतात, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

Edited By : Atul Mehere

Dheeraj Lingade and others
Pawar-Fadnavis Absence In Buldhana : बुलडाण्यातील ‘शासन आपल्या दारी’ला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी; जालन्यातील लाठीहल्ला ठरले कारण?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com