Congress MP Accident: मोठी बातमी: उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीहून गावी परतणाऱ्या काँग्रेस खासदाराचा भीषण अपघात

Maharashtra Congress leader accident : काँग्रेस खासदार हे उपराष्ट्रपतीपदाचा निकाल जाहीर झाल्यानंतर विमानाने मुंबईला दाखल झाले होते. त्यांनी त्याठिकाणी कार्यालयीन कामकाज पूर्ण केल्यानंतर आपल्या वाहनाने भंडाऱ्याकडे निघाले होते.
Congress MP Prashant Padole Accident .jpg
Congress MP Prashant Padole Accident .jpgSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृती अस्वस्थतेचं कारण देत आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिला होता. यानंतर उपराष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्राचे राज्यपाल आणि भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन विजयी झाले आहेत. तर विरोधकांच्या इंडिया आघाडीचे बी.सुदर्शन रेड्डी यांचा पराभव झाला. पण या निवडणुकीत मतदान करु परतत असलेल्या महाराष्ट्रातील काँग्रेसच्या (Congress) खासदाराचा भीषण अपघात झाला आहे.

काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे हे मुंबईमार्गे भंडाऱ्याकडे जात असताना त्यांच्या वाहनाला गुरुवारी(ता.11) पहाटे भीषण अपघात झाला. ही घटना नागपूर बायपासवरील उमरेड फाट्याजवळ सकाळी सहाच्या सुमारास घडली. या अपघातावेळी गाडीत खासदार पडोळे यांच्यासह त्यांचे स्वीय सहायक आणि बाकी सहकारीही बसलेले होते.

प्रशांत पडोळे हे 2024 च्या निवडणुकीत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे सुनील बाबुराव मेंढे यांचा 36,380 मतांनी पराभव केला. देशाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील मतदानासाठी खासदार पडोळे हे दिल्लीला गेले होते.

मात्र, खासदार पडोळे हे गुरुवारी पहाटे मुंबईहून भंडाऱ्याकडे परतत असताना हा अपघात (Accident) घडला. या अपघातात सुदैवानं जीवितहानी टळली. खासदार पडोळे किरकोळ जखमी झाले आहेत. पण त्यांच्या फॉर्च्युनर (एमएच 36 एपी 9911) गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

Congress MP Prashant Padole Accident .jpg
Election Commission:'स्थानिक'च्या निवडणुकांआधी निवडणूक आयोग 'हा' मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; राजकीय पक्षांची धडधड वाढली

काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे हे उपराष्ट्रपतीपदाचा निकाल जाहीर झाल्यानंतर विमानाने मुंबईला दाखल झाले होते. त्यांनी त्याठिकाणी कार्यालयीन कामकाज पूर्ण केल्यानंतर आपल्या वाहनाने भंडाऱ्याकडे निघाले होते.

पडोळे यांची गाडी नागपूर बायपासवरील उमरेड फाट्याजवळ पोहोचली होती. त्याचवेळी अचानक समोरून आलेल्या वाहनामुळे खासदारांच्या गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यानं त्यांची गाडीला जोरदार धडक बसली.

Congress MP Prashant Padole Accident .jpg
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: '...तर आज उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे एकत्र असते!'; सरकारमधील मंत्र्याचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

या भीषण अपघातानंतर डॉ. प्रशांत पडोळे यांच्यासह वाहनातून प्रवास करणारे त्यांचे सहकारी सुखरूप आहेत. या अपघाताची माहिती मिळताच खासदार पडोळे यांच्या समर्थकांनी अपघातासह त्यांच्या नेत्याच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी एकच धावाधाव सुरु केली.पण पडोळे आणि त्यांचे सर्वसहकारी सुखरुप असल्याचे समजताच त्यांचा जीव भांड्यात पडला.

स्थानिक पोलिसांनी अपघातानंतर घटनास्थळी धाव घेतली. खासदारांचं वाहन रस्त्याच्या एका बाजूला हलवले. त्यानंतर या अपघातात किरकोळ जखमी झालेल्या खासदार डॉ. पडोळे यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. महामार्ग पोलिसांकडून या अपघाताची पुढील तपास सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com