Congress News : ‘वज्रमूठ’नंतरही संपली नाही कॉंग्रेसमधील गटबाजी, नाइलाजाने आले पटोले?

Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीची दर्शन कॉलनीतील सभा चांगलीच यशस्वी झाली.
Nana Patole, Sunil Kedar and Vikas Thakre.
Nana Patole, Sunil Kedar and Vikas Thakre.Sarkarnaa
Published on
Updated on

Mahavikas Aghadi's Meeting in Nagpur : २०१४पासून बलाढ्य झालेल्या भाजपला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीने वज्रमूठ आवळली खरी. पण कॉंग्रेसमधील गटबाजी संपण्याचे नाव घेत नाहीये. माजी मंत्री डॉ. नितीन राऊतांची दांडी, शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांचे शेवटच्या दिवशी ॲक्टीव होणे आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची बैठकीबाबतची उदासीनता कुणापासूनही लपून राहिलेली नाही. (Nana Patole's indifference towards the meeting)

आरपारची लढाई एकीने लढण्याची वेळ आली असताना कॉंग्रेसमध्ये बेकी बघायला मिळत आहे. असे झाल्यास वज्रमुठीचा हेतू साध्य होणार नाही, असं दिसतंय. महाविकास आघाडीची दर्शन कॉलनीतील सभा चांगलीच यशस्वी झाली. पण पूर्व नागपूर विधानसभेवर शिवसेना दावा करणार असल्याच्या चर्चेने काँग्रेसची चिंता वाढली आहे. दुसरीकडे पूर्व नागपूर यंदा मिळणारच या आशेवर असलेल्या राष्ट्रवादीतही अस्वस्थता निर्माण झाली आहे.

चतुर्वेदी अचानक झाले सक्रीय..

महाविकास आघाडीची सभा पूर्व नागपूरमध्येच घ्यायची याचे राजकीय आडाखे आधीच बांधण्यात आले होते. सुनील केदार यांना सभेचे संयोजक नेमल्यानंतर काही वर्षांपासून राजकारणातून थोडे अलिप्त असलेले माजी मंत्री सतीश चतुर्वेदी एकदम सक्रिय झाले. पहिल्या पत्रकार परिषदेपासून तर सर्व नियोजनाच्या बैठकांमध्ये त्यांना मानाचे स्थान देण्यात आले होते.

नानांना आधीच आली होती कल्पना..

या सर्व बैठकांना उपस्थित असलेले काँग्रेसचे पदाधिकारी हे शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांचे पक्षांतर्गत विरोधक होते. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत ठाकरे सभेच्या तयारीकडे फिरकलेच नाहीत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना या खेळीची कल्पना आली होती. सभेबाबत ते फारसे उत्सुक नव्हते. मध्येच राहुल गांधी आणि प्रियंका वड्रा यांची नागपूरमध्ये सभा होणार असल्याचे सांगून त्यांनी थोडी खळबळ उडवून दिली होती.

Nana Patole, Sunil Kedar and Vikas Thakre.
Mahavikas Aghadi News : वज्रमूठ सभा राजकारणाला नवी दिशा देणार, आघाडीच्या नेत्यांना विश्‍वास..

..तर गेला असता चुकीचा मेसेज !

नानांच्या या प्रयत्नाने काही साध्य झाले नाही. संभाजी नगरच्या सभेला ते अनुपस्थित होते. नागपूरच्या सभेची जबाबदारी काँग्रेसकडे देण्यात आली होती. या सभेला त्यांनी दांडी मारली असती तर मेसेज चुकीचा गेला असता. त्यामुळे पटोले यांना नाइलाजाने यावे लागले, असे बोलल्या जात आहे.

Nana Patole, Sunil Kedar and Vikas Thakre.
शिवसेनेच्या फोडाफाडीबाबत समन्वय समितीने निर्णय घ्यावा : विकास ठाकरे

नवा गडी नवा राज..

पूर्व नागपूर एकेकाळी सतीश चतुर्वेदी यांचा बालेकिल्ला होता. पाच वेळा ते येथून निवडून आले होते. मात्र भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी येथील त्यांचे वर्चस्व संपविले. विलास मुत्तेमवार गटासोबत संबंध विकोपाला गेल्यानंतर चतुर्वेदी जवळपास नागपूरच्या राजकारणातून बाहेर फेकले गेले होते. दरम्यान त्यांचे पुत्र दुष्यंत चतुर्वेदी यांनी शिवसेनेत प्रवेश करून सर्वांना धक्का दिला.

यवतमाळ येथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने त्यांना विधान परिषदेत पाठविले. एवढेच नव्हे तर नागपूरचे संपर्क प्रमुख करून ठाकरे सेनेची सर्व सूत्रे त्यांच्या हाती सोपवली. आता त्यांचा आमदारकीचा कार्यकाळ संपला आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भाजपला पराभूत करण्यासाठी ही आघाडी कायम ठेवण्याचा विचार बळावत चालला आहे.

असे झाल्यास एका जागा शिवसेनेला (Shivsena) सोडावी लागेल. ती कुठली असेल याचे उत्तर आघाडीच्या (Mahaikas Aghadi) सभेने दिले आहे. दुष्यंत यांचे आदित्य ठाकरे, (Aditya Thackeray) संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासोबत अतिशय जवळचे संबंध आहेत. नागपूरमधून थेट मातोश्रीपर्यंत तेच जाऊ शकतात.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com