Bharat Jodho Ground : काँग्रेस पक्षाच्या 138 व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात आयोजित जाहीर महारॅलीतून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. महारॅलीतून काँग्रेसने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. महारॅलीच्या मैदानावर मान्यवरांसाठी तीन व्यासपीठ उभारण्यात आले होते. सभास्थळी मोठ्या प्रमाणात आसनव्यवस्था करण्यात आली होती. त्यातील प्रत्येक खुर्चीवर खास ‘क्यूआर कोड’ लावण्यात आले होते.
महारॅलीच्या निमित्ताने लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसने पक्षनिधीसाठी देखील प्रयत्न केला. महाराष्ट्रासह तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेशातून मोठ्याप्रमाणावर पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक महारॅलीत सहभागी झाले होते. दिघोरीतील मैदानावर झालेली ही महारॅली यशस्वी ठरली आहे. अशात निवडणूक लढण्यासाठी काँग्रेसला मोठ्याप्रमाणावर निधीची गरज लक्षात घेता काँग्रेसने आगळीवेगळी शक्कल लढविली.
काँग्रेसने महारॅलीतून देणगीदारांना पक्षनिधी देण्याचे आवाहन केले. देणगी देणाऱ्यांची लॉटरी काढण्यात येईल. त्यातून निवडण्यात येणाऱ्या पाच जणांना राहुल गांधी यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येईल, असे महासचिव मुकुल वासनिक यांनी जाहीर केले. सत्ताधारी पक्षाच्या तुलनेत विरोधी पक्षांना देणगी गोळा करताना अनेक अडचणी येतात. अशा परिस्थितीत काँग्रेसने सभेसाठी येणाऱ्या लोकांकडेच देणगी मागण्याचे ठरवले.
नागपुरातील सभास्थळी नागरिकांना देणगी देण्याबाबत आवाहन करणारे फलक लावण्यात आले होते. सभेत बसण्यासाठी मोठ्या प्रमाणात खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक खुर्चीवर ‘क्यूआर कोड’ लावण्यात आला होता. 138 वर्षांपासून लोकांच्या सेवेत असलेल्या कॉंग्रेसला आर्थिक स्वरूपात मदत करा, असे आवाहन त्यावर करण्यात आले होते. काँग्रेसने ‘पार्टी क्राऊड फंडिग’ राबवत ‘डोनेट फॉर देश’ ही मोहीम हाती घेतली. आगामी 2024 मधील लोकसभा निवडणुकीसाठी निधी उभारण्याचे आव्हान सध्या पक्षाला भेडसावत आहे. त्यामुळे ‘क्यूआर कोड’चा प्रयोग राबविण्यात आला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काँग्रेसने 18 डिसेंबरला ‘डोनेट फॉर देश’ मोहीम सुरू केली. अशात गुरुवारी 28 डिसेंबरला काँग्रेसने आपला 138 वा स्थापना दिवस नागपुरात जाहीरपणे साजरा केला. पक्षाला 138 वर्ष पूर्ण झाल्याने 138 रुपये, 1 हजार 380 रुपये, 13 हजार 800 रुपये किंवा या रकमेच्या दहापट रक्कम पक्षनिधीसाठी देण्याचे आवाहन करण्यात आले. या मोहिमेत स्वत: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी 1 लाख 38 हजार रुपयांची देणगी दिली. त्याच पार्श्वभूमीवर नागपुरात हे ‘क्यूआर कोड’ लावण्यात आले होते. त्याला महारॅलीत सहभागी झालेल्यांपैकी किती जणांनी प्रतिसाद दिला, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.