Nagpur : निवडणूक आयोगानं चौकशीला बोलावल्यास सामोरे जाऊ

Congress : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट केली ‘पनौती’ शब्दावरून पक्षाची भूमिका
Mallikarjun Kharge & Rahul Gandh.
Mallikarjun Kharge & Rahul Gandh.Google
Published on
Updated on

Mallikarjun Kharge : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेली टिप्पणी हा काही प्रचंड मोठा विषय नाही. निवडणुकीचा काळ असल्यानं भाजप त्याचा बाऊ करतेय. निवडणूक आयोगानं राहुल गांधी यांना दिलेली नोटीस मोठी बाब नाही. आम्ही त्याचं उत्तर देऊ. चौकशीला बोलावलं तर त्याला सामोरे जाऊ, अशी भूमिका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केली.

उपराजधानी नागपूर येथे गुरुवारी (ता. २३) खर्गे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. (Congress President Mallikarjun Kharge Says At Nagpur That Comment Of Rahul Gandhi Is Not Very Serious Issue Party Will File Answer To Election Commission)

Mallikarjun Kharge & Rahul Gandh.
Bhandara News : ‘पनौती’ शब्दावरून भाजप आपलंच हसू करून घेतेय

राजस्थान येथील एका निवडणूक प्रचार सभेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांचं नाव न घेता ‘पनौती’ असा उल्लेख केला होता. भारतीय संघ चांगलं खेळत होता, पण ‘पनौती’ तिकडे गेले आणि संघाला हरवलं असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. राहुल यांच्या या वक्तव्यानंतर भाजपनं आक्षेप घेतला. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडं तक्रारही करण्यात आली.

भाजपच्या तक्रारीच्या आधारे निवडणूक आयोगानं राहुल यांना नोटीस बजावली आहे. शनिवारपर्यंत (ता. 25) त्यांना यासंदर्भात उत्तर सादर करायचं आहे. निवडणूक आयोगाच्या नोटीसनंतर काँग्रेस राहुल यांच्या पाठीशी उभी झाली आहे. यासंदर्भात नागपुरात बोलताना खर्गे म्हणाले की, राहुल यांनी अशी कोणती आपत्तीजनक टिप्पणी केली आहे. सध्या निवडणुकीचा काळ असल्यानं भाजप या प्रकरणाचा जास्त हवा देतेय. चौकशीला बोलावलचं तर आम्ही योग्य ते उत्तर देऊ.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अलीकडच्या काळातील वक्तव्य म्हणजे तुष्टीकरण करणारी आहेत. काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. काँग्रेस भारत जोडोमध्ये लागली आहे आणि सत्ताधारी ध्रुवीकरण करू पाहात आहेत. याचा फटाक त्यांना निश्चितच बसणार आहे. काँग्रेसनं कधीही जातीयवादाला प्रोत्साहन दिलेलं नाही. देशाचं संविधान आणि धर्मनिरपेक्ष राजकारण यावर काम करणारा कोणता पक्ष देशात असेल तर तो पक्ष काँग्रेस आहे, असं ठामपणे खर्गे यांनी नमूद केलं.

Mallikarjun Kharge & Rahul Gandh.
EC to Rahul Gandhi : 'पनौती' टीकेवरून निवडणूक आयोगाची राहुल गांधींना नोटीस, उत्तर देण्यासाठी शनिवारपर्यंत मुदत

जातीनिहाय जनगणनेवर ठाम

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जातीनिहाय जनगणनेची घोषणा केलीय. आम्ही त्याच्यावर ठाम आहोत. देशात काँग्रेसची सत्ता आल्यास आम्ही जातीनिहाय जनगणना करणार आहोत. अशी जनगणना करणं हा आमचा निर्णय आहे. राहुल यांनी स्पष्ट केलंय की, ज्यांची जशी संख्या असेल त्यांना त्या आधारावर आरक्षण देण्यात येईल. जातीनिहाय जनगणना केल्याशिवाय हे शक्य नाही. त्यामुळं आम्ही ते करणार आहोत. असं खर्गे यांनी स्पष्ट केलं.

Edited by : Atul Mehere

Mallikarjun Kharge & Rahul Gandh.
Rahul Gandhi VS Narendra Modi : पोएटिक जस्टिस - पप्पू ते पनौती ! भाजपने जे पेरले तेच उगवले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com