कॉंग्रेस म्हणते, भाजपची ‘वंचित’ला अप्रत्यक्ष मदत, मदत घेतली नसल्याचे वंचितचे स्पष्टीकरण !

काँग्रेसने (Congress) तर भाजप व वंचित हे जिल्ह्यात एकमेकांच्या ‘बी’ टीम म्हणूनच काम करीत असल्याचा आरोप केला आहे.
Congress, Vanchit and BJP
Congress, Vanchit and BJPSarkarnama
Published on
Updated on

अकोला ः जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडणुकीत भाजपने अप्रत्यक्षपणे वंचित बहुजन आघाडीला मदत केली. यावरून वंचित व भाजप एकमेकांची ‘बी’ टीम म्हणून काम करीत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यावर वंचित बहुजन आघाडीने पत्रकार परिषद घेवून भाजपची सभागृहातील अनुपस्थिती हा भाजप-शिवसेनेतील अंतर्गत वाद असल्याचे स्पष्टीकरण दिले.

अकोला (Akola) जिल्हा परिषद (ZP) अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत वंचितने २५ विरुद्ध २३ असा विजय मिळविला. यात भाजपच्या (BJP) पाच सदस्यांची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय ठरला. वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपला केलेल्या मदतीची परतफेड भाजपने जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीत सदस्यांना अनुपस्थित ठेवून केल्याचीही चर्चा आहे. काँग्रेसने (Congress) तर भाजप व वंचित हे जिल्ह्यात एकमेकांच्या ‘बी’ टीम म्हणूनच काम करीत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे वंचितला स्वबळावर जि.प.ची सत्ता मिळाली नसून ती त्यांनी भाजपच्या अप्रत्यक्ष मदतीवर मिळविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेवून याबाबतचे स्पष्टीकरण दिले. वंचित बहुजन आघाडीचे हे निर्विवाद यश आहे. आम्हाला कुणाचाही छुपा पाठिंबा नाही. आमच्या विजयाला कलंकित केले जाऊ नये, असे जिल्हाध्यक्ष देंडवे आणि वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला प्रदेश महासचिव अरूंधती सिरसाट, भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, पश्चिम विदर्भ महासचिव बालमुकुंद भिरड, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, जि.प. अध्यक्ष संगिता अढाऊ, उपाध्यक्ष सुनील फाटकर आदींची उपस्थिती होती.

अकोला जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष करण्यासाठी भाजपने नेहमीप्रमाणेच अप्रत्यक्षपणे मदत केली. यावरुन वंचित आणि भाजप एकमेकांच्या ‘बी’ टिम असल्याचे परत एकदा सिद्ध झाले.

- कपील ढोके, प्रवक्ते, महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटी.

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष या दोन्ही पदांवर वंचितचे उमेदवार स्पष्ट बहुमताने निवडणूक आले आहे. भाजपच्या सदस्यांची अनुपस्थिती वंचितच्या यशसोबत जोडू नये. भाजप व शिवसेनेतील वादामुळे भाजपने सभागृहात अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. वंचितने भाजपची मदत घेतल्याचे आरोप बिनबुडाचे आहेत. भाजपशी आमचा काहीही संबंध नाही.

Congress, Vanchit and BJP
Akola : फडणवीसांनी शब्द दिला अन् ‘वंचित’ने जिल्हा परिषदेची सत्ता राखली

- प्रमोद देंडवे, जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

भाजप ही वंचितच ‘बी’ टिम आहे सर्वांनाच माहीत आहे. यंदा ॲागस्टमध्ये जिल्हा नियोजन समितीची निवडणूक झाली. भाजपकडे पाच सदस्य अर्थात मत असतानाही त्यांच्या उमेदवाराला १४ मतं मिळाली होती. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आमची २३ मते पूर्ण मिळाली होती. वंचितच्या एका उमेदवाराला शून्य मते मिळाली होती. त्यामुळे वंचितने आपली नऊ मते भाजपला दिल्याने त्यांच्या उमेदवाराला १४ मते मिळाली. जानेवारी २०२० मध्येही अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीतही भाजपचे बहिर्गमन केल्याने वंचितचा विजय झाला होता. सोमवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवारच नव्हता. त्यामुळे शिवसेना आणि भाजपअंतर्गत वादाचा प्रश्नच कुठे येतो? शिवसेना आपली भूमिका घेण्यास स्वतंत्र आहे. त्यामुळे वंचितच भाजपची ‘बी’ टीम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

- गोपाल दातकर, जिल्हाप्रमुख शिवसेना, तथा जि .प. गट नेते

भाजपसाठी शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी हे सर्वच विरोधक आहेत. सत्ता स्थापनेसाठी भाजपकडे संख्याबळ नव्हते. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे सदस्य सभागृहात अनुपस्थित राहिले. त्याकडे बघण्याचा आपला-आपला चष्मा आहे. ज्याला ज्या चष्‍मातून बघायचे आहे, त्याने त्या चष्म्यातून बघावे.

- आमदार रणधीर सावरकर, प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हाध्यक्ष, भाजप

https://www.sarkarnama.in/video-story/nota-vote-for-andheri-potnivadnuk

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com