VIDEO - Congress on Radhakrishna Vikhe : 'पालकमंत्री हरवले आहेत' म्हणत अकोल्यात काँग्रेसचं राधाकृष्ण विखेंवर टीकास्त्र!

Kapil Dhoke criticized Radhakrishna Vikhe : 'जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बियाणे व खताचा तुटवडा असतांना पालकमंत्री शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून मुलाच्या निवडणूक प्रचारामध्ये व्यस्त होते.' असं काँग्रेसच्या कपिल ढोकेंनी म्हटलं आहे.
Radhakrishna Vikhe
Radhakrishna VikheSarkarnama

Akola Congress Politics News : 'अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आतापर्यंतचे सर्वात निष्क्रीय व अपयशी पालकमंत्री ठरले आहेत. पालकमंत्री अकोला जिल्ह्याकडे करत असलेले दुर्लक्ष पाहता पुढील दिवसांमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हरवले आहेत, अशा पद्धतीचे कॅम्पेन आम्ही हाती घेणार आहोत.', असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते कपिल ढोके यांनी स्थानिक शासकीय विश्रामगृह अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे उमेदवार राहिलेले डॉ. अभय पाटील, जिल्हा काँग्रेसचे महासचिव अतुल अमानकर, महासचिव अंशुमन देशमुख, महासचिव विजय देशमुख, पवन गावंडे उपस्थित होते.

यावेळी कपिल ढोके यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrishna Vikhe) यांच्यावर टीका करताना म्हटले की, 'पालकमंत्र्यांचा जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय बाबींवरती अंकुश असायला पाहिजे. परंतु सध्याचे पालकमंत्री हे गत फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यात फिरकलेच नाहीत. यांनी कधी अवकाळी पाऊसामुळे नुकसानग्रस्त भागाला भेटी देऊन पाहणी करण्याचे साधे सौजन्य सुद्धा दाखवले नाही.

तर अनेक प्रशासकीय कामे जिल्ह्यामध्ये प्रलंबित आहेत, त्यांचा आढावा सुद्धा पालकमंत्री विखे यांनी घेतलेला नाही. अत्यंत महत्वाच्या खरीपाच्या नियोजन बैठकीला सुद्धा विखे पाटील उपस्थीत नव्हते, तर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बियाणे व खताचा तुटवडा असतांना पालकमंत्री शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून पुत्राच्या निवडणूक प्रचारामध्ये व्यस्त होते.'

Radhakrishna Vikhe
Mahayuti Politics : भंडाऱ्यात महायुतीत बिघाडी, आमदार भोंडेकर म्हणाले, माजी मंत्री फुकेंमुळे अनेकांनी भाजप सोडला !

याशिवाय, 'अनेक बँकांमध्ये पीक कर्जासाठी शेतकरी चकरा मारत आहेत. बँका पीक कर्ज देतांना शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत. अशा वेळी पालकमंत्र्यांनी लक्ष देणे गरजेचे असतांना पालकमंत्री जिल्ह्याकडे ढुंकुणही पाहत नाहीत. ही गोष्ट शेतकऱ्यांसाठी त्रासदायक आहे. गारपिटीची मदत अद्याप मिळाली नाही.

तर एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ११ हजार ८४३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. या करिता ३२ कोटी ९५ लाख ९६ हजार ३८ रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव १४ मे रोजी शासनाकडे सादर केला आहे. त्यामुळे ५४ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पडून आहे. पेरणी संपत आली तरीही शेतकऱ्यांना ही मदत मिळालेली नाही.' अशी टीकाही कपिल ढोके यांनी केली.

तसेच 'पालकमंत्री विखे ही मदत शेतकऱ्यांना मिळवून देण्यातही अपयशी ठरले आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी ही दोन्ही महत्वाची पदे रिक्त आहेत. शेत मोजणीचे हजारो प्रकरणे भूमी अभिलेख विभागाकडे प्रलंबित आहेत.' असंही सांगितलं.

Radhakrishna Vikhe
Akola Municipal News : अकोला महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये सव्वा कोटीचा घोळ!

जिल्हयातील शेतकरी विविध समस्यांनी त्रस्त झाले आहेत तर सर्व सामान्य नागरिकांचे कुणी ऐकायला तयार नाही. त्यांनी आपल्या व्यथा मांडायच्या तरी कुठे? पिण्याच्या पाण्याची समस्या जटील बनली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना जिल्ह्याकडे पाहायला वेळ नसणे हे दुर्दैव असल्याचे डॉ. अभय पाटील म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparrkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com