Akola Municipal News : अकोला महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये सव्वा कोटीचा घोळ!

Akola Municipal Case of Fraud : अकोला 'मनपा'च्या सेवानिवृत्त लिपिकाविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल.
Akola
Akola Sarkarnama

Akola Municipal Cleaning Staff Pension News :अकोला महापालिकेमध्ये कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये आर्थिक घोळ केल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी अखेर पेन्शन शाखेचे सेवानिवृत्त लिपिक अशोक गणेशराव सोळंके यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,1 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2021 दरम्यान महापालिकेमध्ये अशोक सोळंके यांनी सेवेत नसलेल्या लोकांच्या खात्यात महापालिकेचे पैसे कापून ते पैसे काढून घेतले होते.

असा एकूण 1 कोटी 27 लाख 26,927 रुपयाचा आर्थिक अपहार केला असल्याची तक्रार महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी अतुल दलाल यांनी सिटी कोतवाली पोलिसात दिली होती.

या तक्रारीवरून 25 जून रोजी आरोपी अशोक सोळंके विरुद्ध अप.नं. 207, कलम 409, 420 भादंवि नुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस (Police) निरीक्षक सुनील वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक बी.सी.रेघीवाले, आतिष बावस्कर, नवलकार करीत आहेत.

Akola
Sunil Kedar Big News : राज्य सरकार काँग्रेसच्या सुनील केदारांना झटका देणार; 'या' प्रकरणी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

वाल्मिकी सेनेने केला होता खुलासा -

वाल्मिकी सेनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल सारवान यांनी याप्रकरणाबाबत महापालिकेमध्ये अनेकदा माहिती मागितली. मात्र आधीच्या महापालिका (Corporation) प्रशासनाने माहिती दडपून ठेवली. अखेर विद्यमान अकोला (Akola) मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांना भेट घेऊन चर्चा करून निवेदन देण्यात आले. तेव्हा प्रकरणाला वाचा फुटली आहे.

Akola
Balwant Wankhede Oath : अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडेंची मराठीत शपथ अन् 'जय भीम-जय शिवराय'ने शेवट...

मागील दीड वर्षापासून यासंदर्भात पाठपुरावा सुरु होता. महापालिकेतील अधिकारी यासंदर्भात कुठलीही माहिती देण्यास तयार नव्हते. अखेर आज याप्रकरणी संबधिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अशी प्रतिक्रिया वाल्मिकी सेनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल सारवान यांनी दिली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com