Akola : महिलेला बलात्काराची धमकी देणारा आरोपी कोणत्या आमदाराचा पंटर?

Channi Police : राज्य महिला आयोगाने मागितला पोलिस अधीक्षकांना अहवाल
Complaint of Women Against MLA's Supporter.
Complaint of Women Against MLA's Supporter.Sarkarnama
Published on
Updated on

Akola : आमदाराच्या नावाने विनयभंग केल्यानंतर आरोपीने पीडितेला बलात्काराची धमकी दिल्याचे अकोला येथील प्रकरण आता राज्य महिला आयोगापर्यंत पोहोचले आहे. पातूर तालुक्यातील चान्नी पोलिस स्टेशन येथे विनयभंगाची तक्रार देऊनही आरोपी आमदाराच्या नावाने धमकावत असल्याचे या महिलेने महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांना तातडीने अहवाल पाठविण्यास सांगितले आहे.

आरोपीवर पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप पीडितेने केला आहे. त्यामुळे तिने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशाराही दिला आहे. चान्नी पोलिसांनी तक्रार नोंदवून न घेतल्याने आरोपी आणि पोलिस हे ज्याच्या दबावाला बळी पडत आहे, तो आमदार कोण याची माहिती जगजाहीर करावी, अशी दादही या महिलेने मागितली आहे.

Complaint of Women Against MLA's Supporter.
Akola Loksabha : अकोला लोकसभेची जागा प्रकाश आंबेडकर लढणार; संजय राऊतांकडून 'कन्फर्मेशन'

पीडित महिलेने बाळापूरच्या उपविभागीय पोलिस अधिकारी व राज्य महिला आयोगात यासंदर्भातील रितसर लेखी तक्रार दाखल केली आहे. पीडित व आरोपी दोघेही वेगवेगळ्या धर्माचे आहेत. त्यामुळे या प्रकरणाला जातीय रंग देण्याचाही प्रयत्न दिला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशात काही अनुचित घडण्यापूर्वीच पोलिसांनी ठोस कारवाई करणे गरजेचे झाले आहे.

भजनाला जात असताना आरोपीने पीडितेचा विनयभंग केला. ‘मैं आमदार का आदमी हूँ. अगर किसी को बताया तो तुझे और तेरे भाई को जिंदा जलाकर मार डालूंगा’, अशी धमकी या महिलेला देण्यात आली होती. पीडित महिलेने आरोपी विरोधात चान्नी पोलिस स्टेशन गाठले. मात्र पोलिसांनी पीडित व तिच्या भावाला दररोज ‘उद्या या..’ असे सांगत तक्रार घेतली नाही. हा प्रकार कळल्यानंतर आरोपीने पुन्हा महिलेला गाठले. पोलिस स्टेशनला तक्रार द्यायला गेली होती. ती घेतली नाही. घेणारही नाही. आपण आमदारच्या जवळचा व्यक्ती असून आता बलात्कार करून दाखवू अशी धमकी त्याने महिलेला दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सततचा छळ असह्य झाल्याने आता या महिलेने पोलिस उपअधीक्षक व राज्य महिला आयोगाकडे दाद मागितली आहे. आपण गरीब असल्याने पोलिसांनी तक्रार घेतली नाही. कसाबसा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र त्यानंतरही तो बलात्काराची धमकी देत असल्याचे तिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. यासंदर्भात महिलेने 26 डिसेंबरला पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतरही कारवाई करण्यात आली नाही, असा आरोपही तक्रारीत आहे.

आरोपीचे नाव नमूद करीत या महिलेने आता 11 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत सखोल चौकशी करीत संबंधित आमदाराचे नावही सार्वजनिक करण्याची मागणी तिने केली आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Complaint of Women Against MLA's Supporter.
Akola : IPS बच्चन सिंग, जिथे गेले ठरले ‘किंग’; अकोल्यात गुन्हेगारांची उतरविणार का झिंग?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com