Congress Vs BRS : बरेचदा असं घडतं की एखाद्या गोष्टीसाठी कुणी जीवतोड परिश्रम घेतो. ते कामही पूर्णत्वास आलेलं असतं, पण ऐनवेळी बाजी कुणी भलताच मारून नेतो. असाच अनुभव चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला आला आहे. महाराष्ट्र-तेलंगणाला जोडणाऱ्या रस्त्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसनं आंदोलनाचं नियोजन केलय, पण तेलंगणातील भारत राष्ट्र समितीनं काँग्रेसच्या एक दिवस आधीच आंदोलन करण्याची घोषणा केलीय.
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी धाबा या तेलंगणाला जोडणाऱ्या मार्गाचं काम गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. वर्षभरात हे काम पूर्ण होणं अपेक्षित होतं. परंतु हे काम अद्यापही अपूर्ण आहे. (Congress Vs BRS Politics For Protest on Roads Connecting Chandrapur to Telangana)
मार्गाचं काम अर्धवट असल्याने या ठिकाणी अनेक अपघात घडले आहेत. अपघातांमध्ये अनेकांना कायमचे अपंगत्वदेखील आलेय. त्यामुळे मार्गाच्या कामाचा हा मुद्दा काँग्रेसनं उचलून धरण्याचा निर्णय घेतलाय. निवडणुकीचा काळ जवळ येत आहे. अशात हा मुद्दा ‘कॅश’ करण्यासाठी काँग्रेसनं फिल्डिंग लावली. काँग्रेस २१ नोव्हेंबर रोजी या मार्गावर आंदोलन करणार आहे. मात्र, बीआरएसने काँग्रेसच्या नहले पे दहला मारत एक दिवस आधीच म्हणजे २० नोव्हेंबरला आंदोलनाची हाक दिलीय.
बीआरएसनं खेळलेल्या या खेळीमुळं चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. तेलंगणानंतर लवकरच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळं चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस फ्रंटफूटवर आली आहे. इतर राजकीय पक्षही जनतेच्या मुद्द्यावर आंदोलन करीत आहेत. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानं बीआरएसचं मनोबल चांगलंच उंचावलंय.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा क्षेत्रातील गोंडपिपरी धाबा मार्गाचा मुद्दा सध्या सगळ्याच पक्षांसाठी ‘व्होटबँक’चा विषय ठरत आहे. त्यामुळे या मार्गासाठी अनेक पक्ष आंदोलन करण्याच्या तयारीत होत. अशात काँग्रेसनं आघाडी घेतली, पण बीआरएसनं त्यांना ‘ओव्हरटेक’ केलंय. गोंडपिपरी धाबा-हिवरा फाटा या मार्गाची चांगलीच दुरवस्था झालीय. रस्त्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि बीआरएसनं एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही केले आहेत. सत्ता असताना नेत्यांनी या मार्गाकडं दुर्लक्ष केलं अशी टीका बीआरएसचे भूषण फुसे यांनी केलीय. खेडी ते पोडसा हा मार्ग महत्त्वाचा आहे. अनेक वर्षांपासून त्याचं काम झालेलं नाही. आम्ही त्याची प्रतीक्षा केली. शेवटी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला, असं काँग्रेसचे देविदास सातपुते यांनी सांगितले. चंद्रपुरात सध्या काँग्रेस आणि बीआरएसमध्ये सुरू असलेल्या राजकीय सामना अत्यंत रंजक झालाय. त्यामुळं आगामी काळातही अशी रस्सीखेच येथील नागरिकांना बघायला मिळणार हे निश्चित.
Edited by : Prasannaa Jakate
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.