Sawarkar Politics: स्वा. सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य; शिवानी वडेट्टीवार माफी मागणार?

शिवानी वडेट्टीवार यांनी स्वा. सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने भाजपने त्यांना माफी मागण्याची मागणी केली आहे
Shiwani Wadettiwar | Sawarkar Politics
Shiwani Wadettiwar | Sawarkar Politics Sarkarnama
Published on
Updated on

BJP-Congress Politics काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी एका कार्यक्रमात सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे या वादात आता आणखी एक ठिणगी पडली आहे. शिवानी यांच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता भाजपने आक्रमक भूमिका घेत माफी मागण्याची मागणी केली आहे. मात्र शिवानी वडेट्टीवार यांनी माफी मागण्यासा नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. (Controversial remarks about Savarkar; Will Shivani Vadettiwar apologize?)

खरतंर शिवानी वडेट्टीवार यांनी अद्याप माध्यमांसोर येऊ काहीही सांगितलं नाही. मात्र काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला. शिवानी यांचे भाषण सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर, आपण त्यांच्याकडून हे वक्तव्य चुकून झालं असेल तर त्यांनी माफी मागावी, अशी सूचना त्यांना केली. पण शिवानी यांनीच सावरकरांच्या त्या वक्तव्यांचा संदर्भ सावरकरांनी स्वतः लिहिलेल्या 'सहा सोनेरी पाने' या पुस्तकात असल्याचं सांगितलं. त्यामुळे शिवानी वडेट्टीवार यांनी केलेलं वक्तव्य स्वतः सावरकरांचंच असेल तर त्यांनी माफी मागण्याची गरज नाही, असे वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितलं आहे.

Shiwani Wadettiwar | Sawarkar Politics
Karnataka Election 2023 : भाजपमधून गळती सुरुच ; येदियुरप्‍पांच्या नातवाचा JDS मध्ये प्रवेश ; बहीण भावावर नाराज...

काय म्हटलंय शिवानी वडेट्टीवारांनी?

फुले, शाहू, आंबेडकरांसाठी कधीच मोर्चे काढत नाहीत. कुठला मोर्चा काढतात..? तर सावरकर मोर्चा काढतात आणि सावरकर मोर्चा काढून काय करतात? माझ्यासह इतर महिला भगिनी येथे उपस्थित आहेत.सगळ्‍यांना भिती वाटत असेल कारण सावरकरांचे विचार काय होते, तर Rape is a Political Weapon and it should be use against your political opponent. म्हणजे काय? सावरकर म्हणायचे की, रेप हे पॉलिटिकल हत्यार आहे. हे तुम्ही आपल्या पॉलिटिकल विरोधात वापरलं पाहिजे. तर माझ्यासारख्या महिला भगिनीला, येथे उपस्थित महिला भगिनींना कसं सेफ वाटणार आहे आणि अशा लोकांचा प्रचार करत हे लोक रॅली काढतात.’

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com