Cotton Farmers News : दरवाढीची आस लावलेल्या शेतकऱ्यांकडून पडत्या दरात कापूस विक्री !

Nagpur : आजही मोठ्या प्रमाणात कापूस पडून आहे.
Cotton of Nagpur District
Cotton of Nagpur DistrictSarkarnama
Published on
Updated on

Nagpur District Cotton Farmers News : यंदाच्या हंगामात कापसाने शेतकऱ्यांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. शेतशिवारात कापसाचे चांगले उत्पादन होऊनही मालाला भाव मिळत नसल्याने आजच्या घडीला शेतकऱ्यांच्या घरात आजही मोठ्या प्रमाणात कापूस पडून आहे. आज ना उद्या कापसाचे भाव वाढतील, याची आस लावून बसलेल्या शेतकऱ्याला आज पडत्या दरात कापूस विक्री करावी लागत आहे.

‘पांढऱ्या सोन्या'ने शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे. गतवर्षी मिळालेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली. परंतु अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या प्रयत्नांवर पाणी फिरवले आहे. अतिवृष्टी आणि रोगराईमुळे कपाशीला मोठ्या प्रमाणात फटका बसला. चांगले उत्पन्न मिळवून देणारे पीक‎ समजल्या जाणाऱ्या कापसाच्या‎ दरात आता दिवसेंदिवस घसरण होत असल्याने‎ शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.‎

दरवेळी दिवाळीपासून विक्री सुरू‎ झाल्यानंतर जानेवारीपर्यंत ८०‎ टक्क्यांपर्यंत कापूस विकला जातो. ‎यावर्षी मात्र मार्च महिना संपत‎ आला असतानाही बहुतेक शेतकऱ्यांनी कापूस विक्री अद्यापही केलेली नाही. अतिवृष्टी, परतीच्या पावसाने झालेले नुकसान, कापूस वेचणीसाठी झालेला खर्च, खते, बियाणे, कीटकनाशकांची फवारणी, मशागत, मेहनत या सर्व बाबींचा विचार करता अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना कापसाच्या उत्पन्नातून फायदा होण्याऐवजी नुकसानच होत आहे.

परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. मात्र आता लग्न समारंभ, मुलांचा शिक्षणाचा खर्च, कृषी केंद्राची उधारी आणि दैनंदिन कौटुंबिक खर्चाचे गणित बिघडल्याने शेतकऱ्यांना नाइलाजास्तव मिळेल त्या भावात कापूस घराबाहेर काढून विकावा लागत आहे.

Cotton of Nagpur District
Farmers News : कृषीमंत्री सत्तारांच्या मतदारसंघात शेतकरी दाम्पत्याने जीवन संपवले..

भाव कमी अन् टेन्शन जास्त..

दिवाळीत कापूस निघाल्यानंतर शेतकऱ्यांच्या घरी गोडधोड होते. मात्र, कापसाला भावच नसल्याने शेतकऱ्यांनी तो घरीच ठेवला. भाव मिळेल या आशेवर घरी कापसाचे ढीग वाढत गेले. आता होळीचा सणही गेला तरी कापसाला अजूनही समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याचे टेन्शन वाढले आहे.

बळीराजा दुहेरी संकटात..

गेल्या काही महिन्यांपासून कापूस शेतकऱ्यांच्या घरीच पडून आहे. भाव मिळेल या आशेवर शेतकऱ्यांनी कापूस विकला नाही. दिवाळी गेली, होळीही गेली तरी कापसाला भाव नाही. त्यामुळे सणासुदीतही शेतकरी अडचणीत सापडला आहे.

Cotton of Nagpur District
Farmers News: ५० खोके द्यायला पैसा आहे; शेतकऱ्यांसाठी का नाही? विरोधकांची सरकारवर गारपीट !

कापूस, (Cotton) सोयाबीन अन् तूर या खरीप हंगामातील पिकांवर यंदा शेतकऱ्यांची भिस्त होती. मात्र यंदा अतिवृष्टी, परतीचा पाऊस, बोंडअळी, विविध किडींचा प्रादुर्भाव अशा अनेक संकटांचा सामना करावा लागला. सध्या कापसाला मिळत असलेल्या भावातून पिकांवर केलेला खर्चही निघत नसल्याने विदर्भातील (Vidarbha) शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याचे समीर नरड या शेतकऱ्याने सांगितले.

यंदाही आर्थिक कोंडी..

सध्या कपाशीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. उत्पादनात बऱ्यापैकी वाढ होत असली तरी बाजारभावामुळे शेतकऱ्यांच्या (Farmers) हातात काहीच उरत नाही. यातून कपाशी लागवडीसाठी लागलेला खर्च, फवारणी आणि इतर खर्च काढून शेतकऱ्याच्या हाती काहीच शिल्लक राहत नाही, नंदू गंधारे या शेतकऱ्याने सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com