Nagpur Winter Session 2023 : 'क्या हुआ तेरा वादा!' धनगर आरक्षणाच्या आश्वासनाची फडणवीसांना करून दिली आठवण

Dhangar ST Reservation : नागपूर हिवाळी अधिवेशनावर धनगर समाजाचा मोर्चा
Nagpur Dhangar March
Nagpur Dhangar MarchSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Winter Session : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर विविध मागण्यांसाठी अनेक मोर्चे धडकताना दिसत आहे. एसटी आरक्षणाची लवकर अंमलबजावणी करावी, यासाठी सोमवारी धनगर समाजाने नागपूर येथे मोठा मोर्चा काढला होता. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांना उद्देशून झळकलेल्या फलकांनी लक्ष वेधून घेतले.

भाजप प्रदेशाध्यक्ष असताना फडणवीसांनी २०१३ मध्ये धनगर समाजाला सत्तेत आल्यास पहिल्या कॅबिनेटमध्येच आरक्षण देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर राज्यासह देशात भाजपचे सरकार आले. फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने आश्वासन पूर्ण करतील, अशी आशा समाजाला होती. मात्र पूर्ण पाच वर्षे सत्तेत असतानाही मागणी पूर्ण झाली नाही. आता पुन्हा राज्यात भाजपप्रणीत महायुतीची सत्ता आहे. त्यामुळे धनगर आरक्षणाच्या मागणीने जोर धरल्याचे दिसून येत आहे.

Nagpur Dhangar March
Jammu Kashmir : मोदींनी आता काश्मिरी पंडितांची गॅरंटी घ्यावी; 370 रद्दनंतर ठाकरे असं का म्हणाले ?

नागपूर अधिवेशनावर नेण्यात येणाऱ्या मोर्चात राज्यातील धनगर समाजाने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकरांनी केले होते. त्यानुसार अधिवेशनावर मोठा मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी 'क्या हुआ तेरा वादा' या मजकुरासह उपमुख्यमंत्री फडणीसांच्या फोटोचे फलक झळकवले. धनगर समाजाला एसटी आरक्षण लवकर लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

फडणवीस आश्वासान विसरले ?

भाजप सरकार आल्यावर धनगरांना पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊन असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर बांधवांना दिले होते. त्यामुळे आज हिवाळी अधिवेशनावर आरक्षणासाठी धनगर समाजाचा निघालेल्या मोर्चामध्ये सरकार 'क्या हुआ तेरा वादा' अशा आशयाचे पोस्टर घेऊन धनगर समाजाच्या महिला या मोर्चामध्ये सहभागी झाल्या. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा धनगर बांधवांनी त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली.

(Edited by Sunil Dhumal)

Nagpur Dhangar March
Maharashtra News : धक्कादायक! महाराष्ट्रात घडल्या सर्वाधिक दंगली; आठ हजारांहून अधिक घटनांची नोंद

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com