Cricketnama 2023 : रोमहर्षक सामन्यात टीम 'एनसीपी'ने भाजपला दिला पराभवाचा धक्का

BJP Kings Vs NCP (AP) Lions : पहिल्या सीझनचे मालिकावीर अनिकेत तटकरेंची फटकेबाजीपेक्षा गोलंदाजी जमके
BJP Kings Vs NCP (AP) Lions
BJP Kings Vs NCP (AP) LionsSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News (पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी) : एकच वादा.. अजितदादा...अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं भाजपच्या संघावर विजय मिळविला.‘क्रिकेटनामा’च्या दुसऱ्या सिझनचा हा दुसरा सामना अत्यंत चुरशीचा ठरला. मॅच ‘टाय’ झाल्यानं ‘सुपर ओव्हर’ घेत त्याचा निर्णय झाला. त्यात राष्ट्रवादीची टीम वरचढ ठरली.भाजपचे कर्णधार तथा माजी राज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांनी नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यात गेल्या सिझनचे मालिकावीर अनिकेत तटकरे हे चांगली फलंदाजी करू शकले नाही, त्यांची गोलंदाजी मात्र जमके होती.

मेकोसाबाग परिसरात असलेल्या पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी, मेथोडीस्ट हायस्कूलच्या प्ले-ग्राऊंड, श्यालोम स्पोर्ट्स ग्राऊंड परिसरात ‘क्रिकेटनामा’चे सोमवारी (ता. 11) थाटात उद्घाटन झाले. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार स्वागताध्यक्ष व माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके निमंत्रक असलेल्या या स्पर्धेचा दुसरा सामना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप किंग्ज यांच्यात सामन्याला प्रारंभ झाला.( BJP Kings Vs NCP (AP) Lions)

BJP Kings Vs NCP (AP) Lions
Fadnavis Vs Khadse: नाथाभाऊ पुरावा द्या, लगेच कारवाई करतो; फडणवीसांनी दाखवली तयारी

सामन्याला सुरुवात झाल्यानंतर अनिकेत तटकरे यांनी टोलवलेल्या चेंडूची आमदार समीर मेघे यांनी झेल घेत त्यांना बाद केले. राम सातपुते यांच्या खात्यात ही विकेट गेली. चार धावांवर अनिकेत तटकरे ते बाद झालेत. जयकुमार रावळ यांनी दुसऱ्या षटकातील चवथ्या चेंडूवर सारंग यांना आठ धावांवर धावबाद केले. त्यानंतर अनिकेत खोब्रागडे आणि अतुल यांनी सामना सावरला. चौथ्या षटकात अनिकेत खोब्रागडे यांनी टोलावलेला चेंडू भाजपच्या किपरने पकडला. त्यानंतर ‘कॉट बिहाइंड’ची ‘अपिल’ करण्यात आली. परंतु, पंचांनी त्यांना नॉटआऊट घोषित केले. पाच षटक संपल्यानंतर टीम राष्ट्रवादीने भाजपसमोर 58 धावांचं लक्ष्य ठेवलं. (Cricketnama 2023)

टीम राष्ट्रवादीनं ठेवलेलं लक्ष्य गाठण्यासाठी राम सातपुते आणि संतोष दानवे सर्वांत प्रथम मैदानावर उतरले. राम सातपुते यांनी पहिल्याच षटकात दोन षटकार लगावले. राष्ट्रवादीचे गौस यांना हे षटक महाग ठरले. त्यानंतर दुसऱ्या षटकात अनिकेत तटकरे यांच्या पहिल्याच चेंडूवर संतोष दानवे यांनी षटकार लगावला. दानवे फटकेबाजीच्या मूडमध्ये आले असतानाच दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर राष्ट्रवादीच्या किपरने त्यांना ‘स्टम्प आऊट’ केलं. त्यानंतर लागलीच तिसऱ्याच चेंडूवर राहुल कुल हे बाद झालेत. शून्य धावांवर अनिकेत तटकरे यांनीच त्यांची झेल घेतली. जयकुमार गोरे यांनी एक एक करीत काही धावा चोरल्या. राम सातपुते यांनी चौकार व षटकार मारत या सामन्यातही फटकेबाजी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तीन षटकं होईपर्यंत भाजपने दोन गडी गमावत 32 धावा काढल्या. चवथ्या षटकात राम सातपुते हे अनिकेत तटकरे यांच्या चेंडूवर धाव काढण्याच्या प्रयत्नात ‘रनआऊट’ झालेत. त्यानंतर मैदानावर आलेल्या सचिन शेट्टी सामना सांभाळण्याचा प्रयत्न केला. सहा चेंडूने आठ धावांची गरज त्यावेळी होती. तीन गडी बाद 50 धावा अशी भाजपची स्थिती होती.

मात्र, चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अनिकेत तटकरे यांनी संदीप दानवे यांची विकेट घेतली. मैदानावर त्यानंतर आले समीर मेघे. त्यावेळी चार चेंडूत नऊ धाव्या हव्या होत्या. परंतु, धाव घेण्याच्या बेतात सचिन शेट्टी हे शून्य धावांवर ‘रनआऊट’ होत पॅव्हेलियनमध्ये परतले. तीन चेंडूत नऊ धावा त्यावेळी भाजपला हव्या होत्या. मैदानावर येताच मंगेश चव्हाण यांनी षटकार लगावला. शेवटच्या चेंडूपर्यत एक चेंडू आणि दोन धावा अशी संख्या होती. मात्र सामना ‘टाय’ झाला. (Nagpur Winter Session)

सातपुते, गोरे थोडक्यात बचावले

सामना अनिर्णित राहिल्याने ‘क्रिकेटनामा’च्या दुसऱ्या सीझनची पहिली सुपर ओव्हर घ्यावी लागली. राम सातपुते यांनी त्यात फटकेबाजीसाठी प्रयत्न केले. मात्र अनिकेत तटकरे यांच्या चेंडूवर झेलबाद झाले. परंतु पंचांनी तो ‘नो-बॉल’ दिल्यानं सातपुते बचावले. त्यानंतरच्या चेंडूत जयकुमार गोरे हे बोल्ड झालेत. परंतु ती देखील ‘फ्री-हिट’ असल्याने गोरेही बचावले. सुपर ओव्हरमध्ये भाजपने सात धावांचं लक्ष्य अजित पवार गटापुढं ठेवलं.

सारंग यांनी लक्ष्य गाठताना षटकार आणि त्यानंतर एक धाव काढत सामना बरोबरीत आणला. त्यानंतर अनिकेत यांनी एक धाव काढत अजित पवार गटाला विजय मिळवून दिला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या हस्ते अनिकेत खोब्रागडे यांना सामनाविराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नीलेश नातू यांनी सामन्याचं सूत्रसंचालन व समालोचन केलं.

" धावा मी एकटाच काढू शकतो..."

सामन्यापूर्वी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस टीमचे कर्णधार प्रशांत पवार यांनी आपल्या कॉलेजच्या काळातील आठवणी ताज्या झाल्याचं सांगितलं. ‘सरकारनामा’ने भव्यदिव्य स्वरूपाचं आयोजन केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. राजकारणातील दूषित वातावरणापासून दूर येण्याची संधी या माध्यमातून मिळळाल्याचं त्यांनी नमूद केलं.

" आम्ही 20 धावातच रोखणार..."

नाणेफेक जिंकल्यानंतर भाजप टीमचे कर्णधार तथा माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी आपण टीम राष्ट्रवादीला 20 धावात रोखू असा विश्वास व्यक्त केला. त्यावर प्रशांत पवार यांनी मी एकदाच 20 धावा काढेल अशी मिश्किल टिप्पणी केली.

अनिकेत खोब्रागडेंची उत्सुकता

राष्ट्रवादी काँग्रेसच्या टीमधील अनिकेत खोब्रागडे यांना ‘क्रिकेटनामा’बद्दल प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळे ते दुपारी तीन वाजेपासूनच मैदानावर तळ ठोकून होते. मैदानावर त्यांनी फिटनेस आणि सरावही केला. त्याचा परिणाम सामन्यादरम्यान दिसला व त्याचा फायदा राष्ट्रवादीच्या टीमला झाला.

(Edited By Deepak Kulkarni)

BJP Kings Vs NCP (AP) Lions
Winter Session 2023 : 'एनआयए'च्या कारवाईचा मुद्दा उपस्थित करताच अबू आझमींवर भाजप आमदार तुटून पडले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com