भाजपच्या आमदारांवर आघाडी सरकारनं ओढला 'आसूड'

पहिला आसूड मोर्चा भाजप आमदार श्वेता महाले (Shweta Mahale) यांच्या नेतृत्वात चिखली येथे काढण्यात आला होता.

Sanjay Kute Shweta Mahale cm Thackeray
Sanjay Kute Shweta Mahale cm Thackeray sarkarnama
Published on
Updated on

बुलढाणा : शेतकरी व सर्वसामान्य माणसांच्या न्यायहक्कासाठी आमदार श्‍वेता महाले यांच्या नेतृत्वात आघाडी सरकारच्या विरोधात हजारो संतप्त शेतकर्‍यांचा प्रचंड तीव्र आक्रोश आसूड मोर्चा काल काढला आला. आसूड मोर्चाचे आयोजन करणाऱ्या भाजपच्या आमदारांसह पदाधिकारी, कार्यक्रर्त्यांवर राज्य सरकारकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिला आसूड मोर्चा भाजप आमदार श्वेता महाले (Shweta Mahale) यांच्या नेतृत्वात चिखली येथे काढण्यात आला होता. साथरोग नियंत्रण कायद्यानुसार चिखली पोलिस ठाण्यात आमदार श्वेता महाले यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मलकापुरात सुद्धा माजी आमदार चैनसुख संचेती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खामगाव येथे आमदार आकाश फुंडकर तर जळगाव जामोद येथे आमदार संजय कुटे (Sanjay Kute) यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरुद्ध रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

चिखली येथून महाले यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आसूड मोर्च्याला सुरवात झाली होती. यावेळी ओला दुष्काळ जाहीर करा, कोरडवाहू शेतकर्‍यांना 25 तर बागायती शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्या, कृषिपंपांना किमान 10 तास वीज पुरवठा झालाच पाहिजे, श्वेताताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणांनी चिखली शहर दुमदुमून गेले होते.


Sanjay Kute Shweta Mahale cm Thackeray
परमबीर सिंह बेपत्ता? राज्य सरकारनं वेतन रोखलं

मोर्चेकऱ्यांनी विविध मागण्यांच्या पट्ट्या तोंडावर लावून सरकारचा निषेध केला. श्वेता महाले स्वतः बैलगाडी मध्ये उभ्या राहून आपल्या महिल्या पदाधिकाऱ्यासोबत हातात आसूड घेऊन फिरवत होत्या. स्वतःच्या अंगावर आसूड ओढून घेणार्‍या भोप्यांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी त्यांनी आघाडी सरकारने कोरोना काळामध्ये कोरोना वारीयर्सना 50 लाखांचे विमा कवच जाहीर केले होते.

अनेक कोरोना वारीयर्सचा राज्यात मृत्यू झालेला असल्याने आघाडी शासनाने अद्याप पर्यंत कुणालाही विमा कवच दिलेले नसल्याने मृताच्या टाळूवरचे लोणी सुद्धा या सरकारला कमी पडत आहे. तसेच प्रतीक्षा यादीतील पात्र घरकुल धारकांचे नाव वगळल्याने त्यांच्या मनात तीव्र प्रकारचा असंतोष निर्माण झालेला आहे. सर्व्हे झाल्यानंतरची व आताची परिस्थिती बदल झाल्याचे कारण दाखवून पात्र घरकुल धारकांनाही प्रतीक्षा यादीतून वगळल्याचा करंटेपणा या आघाडी सरकारने केला आहे. मोर्चा व संबोधनानंतर तहसीलदार यांना महाले यांनी निवेदन दिलं. जळगाव जामोद येथे डॉ. संजय कुटे यांच्या नेतृत्वाखाली काल आसूड मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com