Amravati : धारणी, चिखलदऱ्याला मिळणार ‘दादां’कडून अतिरिक्त निधी, कारण...

Ajit Pawar : राज्यस्तरीय बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही; अमरावतीच्या विकासावर भर
Planning Meeting of DCM Ajit Pawar.
Planning Meeting of DCM Ajit Pawar.Sarkarnama
Published on
Updated on

Planning Meeting : नागपूरच्या धर्तीवर मेळघाट, चिखलदरा या भागात इको टुरिझम संकल्पना विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठीचा कृती आराखडा तयार करण्यात यावा. धारणी आणि चिखलदरा या दोन तालुक्यांचा आकांक्षित श्रेणीत समावेश आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी शासनस्तरावरून अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेची (सर्वसाधारण) राज्यस्तरीय बैठक मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात आयोजिण्यात आली. त्यावेळी त्यांनी यासंदर्भातील घोषणा केली. बैठकीला अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, अमरावती जिल्हा नियोजन भवन येथून खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके, आमदार देवेंद्र भुयार, विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजित म्हस्के उपस्थित होते.

Planning Meeting of DCM Ajit Pawar.
Amravati Angnwadi : अमरावतीतील 2500 अंगणवाडी सेविका संपावर, तीन निलंबित; काय आहे कारण ?

नागपूरच्या धर्तीवर मेळघाट, चिखलदरा या भागात इको टुरिझम संकल्पना विकसित करण्यात यावी, असे निर्देश पवार यांनी दिले. या प्रकल्पासाठी कृती आराखडा तयार करण्याची सूचनाही त्यांनी केली. चिखलदरा येथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ‘स्कायवॉक’ची उभारणी करण्यात येत आहे. ‘स्कायवॉक’ प्रकल्पाला समांतर विकास प्रकल्प येथे निर्माण करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या विकासकामांवर भर दिला. गेल्या येथे पर्यटकांची संख्या वाढेल. मेळघाटमध्ये ‘ॲडव्हेंचर टुरिझम’ची संधीही निर्माण होऊ शकते. त्यामुळे मेळघाटात यादृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मेळघाटातील पर्यटन विकासाला चालना मिळावी, यासाठी या भागातील लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. धारणी आणि चिखलदरा या आकांक्षित तालुक्याच्या निर्देशांकामध्ये वाढ करण्यासाठी अतिरिक्त निधी शासन उपलब्ध करून देणार आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री दिली. विभागीय आयुक्त आणि अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नागपूर येथील इको टुरिझम संकल्पनेची पाहणी करून त्यापेक्षा चांगला आराखडा सादर करावा, असेही ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अमरावती जिल्ह्यात विविध योजना राबविण्यासाठी 200 कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी यावेळी करण्यात आली. अमरावती जिल्ह्यासाठी यंदा निधी वाढवून मिळावा, अशी मागणी खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके व आमदार देवेंद्र भुयार यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ऊर्जा विभागामार्फत आगामी काळात 22 गावांना लाभ देण्यात येणार आहे. चिखलदरा व धारणी क्षेत्रात इको टुरिझम विकसित करण्यावर भर दिला गेला पाहिजे. मेळघाटात येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जंगल सफारी सुरू करणे गरजेचे आहे.

अमरावती शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालयाचे काम पूर्ण झाले आहे. हे रुग्णालय आता नागरिकांसाठी खुले गरणे गरजेचे आहे, अशी मागणी खासदार राणा यांनी यावेळी केली. अमरावती महापालिका क्षेत्रासाठी आमदार खोडके यांनी 100 कोटी रुपयांच्या वाढीव निधीची मागणी केली. विभागीय क्रीडा संकुलाच्या व्यवस्थापनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, असेही त्या म्हणाल्या. राज्याच्या आर्थिक विकासदरात अमरावती जिल्ह्याची टक्केवारी अधिक वाढावी, यादृष्टीने जिल्ह्यातील विकासकामांना वेग द्यावा लागणार आहे. यासाठी अमरावती जिल्ह्याच्या आर्थिक उत्पन्नात भर टाकणे गरजेचे असल्याचे, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

Edited by : Prasannaa Jakate

R...

Planning Meeting of DCM Ajit Pawar.
Amravati : लोकसभा निवडणुकीपूर्वी यशोमती ठाकूर यांना आणखी मोठी जबाबदारी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com