Amravati : लोकसभा निवडणुकीपूर्वी यशोमती ठाकूर यांना आणखी मोठी जबाबदारी

Congress : महाराष्ट्रातील दोन नेत्यांचा काँग्रेसच्या स्क्रिनिंग कमिटीमध्ये समावेश
Yashomati Thakur, Congress
Yashomati Thakur, CongressSarkarnama
Published on
Updated on

Yashomati Thakur : उपराजधानी नागपूर येथून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर काँग्रेस आता निवडणुकीसाठी जोमाने तयारीला लागली आहे. राज्यातील 48 लोकसभा मतदार संघांमध्ये इच्छुकांना उमेदवारी अर्जाचे वाटप केल्यानंतर आता काँग्रेसने एका खास समितीची स्थापना केली आहे.

काँग्रेसच्या या समितीमध्ये महाराष्ट्रातील दोनच नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदार संघाच्या काँग्रेस आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांचा समावेश आहे. काँग्रेस पक्षाच्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या स्क्रिनिंग कमिटीवर अॅड. ठाकूर यांनी सदस्य पदावर घेण्यात आले आहे.

Yashomati Thakur, Congress
Amravati LokSabha constituency : चंदेरी दुनियेतून राजकारणात आलेल्या नवनीत राणा यांचे ग्रह यंदाही चमकणार?

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसने क्लस्टरनिहाय समित्यांची नेमणूक केली आहे. या समितीमध्ये अध्यक्ष आणि दोन सदस्यांचा समावेश आहे. या समितीला स्क्रिनिंग कमिटी असे नाव देण्यात आले आहे. देशभरातील सर्व राज्यांमध्ये पाच क्लस्टर समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांचे कामकाज हरीश चौधरी, मधुसूदन मिस्त्री, रजनी पाटील, भक्त चरणदास आणि राणा सिंह यांच्या देखरेखीत चालणार आहे. यापैकी महाराष्ट्रातील एका स्क्रिनिंग कमिटीवर आमदार यशोमती ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अॅड. यशोमती ठाकूर या गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या कट्टर कार्यकर्ता आहेत. पक्षाच्या वाढीसाठी त्यांनी अमरावतीसह राज्यात मोलाची भूमिका निभावली आहे. त्यामुळेच त्यांना महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात कॅबिनेट मंत्रीपद काँग्रेसने दिले होते. विदर्भातील दिग्गज काँग्रेस नेत्यांच्या यादीत अॅड. यशोमती ठाकूर यांचेही नाव घेतले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून आपण पक्षाचे कार्य करीत आहोत. महिला, शेतकरी, श्रमिक आणि तरुणाईला न्याय देण्याचे काम काँग्रेस करीत आहे. काँग्रेसच सामान्यांना न्याय देऊ शकते, अशी प्रतिक्रिया यानिमित्ताने आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेस पक्षाने आपल्यावर वेळोवेळी जी जबाबदारी सोपविली ती पूर्ण करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आताही लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष आपल्याला जे काम देत आहे, ते पूर्ण करण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. आमागी लोकसभा निवडणुकीबाबत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात काँग्रेसला देशभरात सकारात्मक पाठिंबा मिळणार आहे. काँग्रेसचे सरकार केंद्रात स्थापन होऊ शकते, अशी परिस्थिती देशभरात असल्याचेही अॅड. ठाकूर यानिमित्ताने म्हणाल्या.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी पक्षाला मजबूत करण्यासाठी आणि देशातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी मोलाचे काम करीत आहेत. काँग्रेस कार्यकर्त्याच्या नात्याने आपणही या प्रयत्नांमध्ये खारीचा वाटा उचलत असल्याची प्रतिक्रिया अॅड. ठाकूर यांनी दिली.

Edited by : Prasannaa Jakate

Yashomati Thakur, Congress
Yashomati Thakur : 'दिल्लीश्वरांची तळी उचलण्यात...' यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांना लगावला टोला!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com