Devendra Fadnavis : मराठा - ओबीसी संघर्षावर फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले,'' दोन समाज समोरासमोर येणं...''

OBC Vs Maratha : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली चिंता
OBC & Maratha Reservation
OBC & Maratha ReservationGoogle
Published on
Updated on

Nagpur News : मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार आहे. परंतु राज्यात दोन समाज समोरासमोर येतील अशी वक्तव्य करणं पूर्णपणे चुकीचं आहे. आपली सर्व समाजांना विनंती आहे की, महाराष्ट्रात कुठलाही समाज एकमेकांसमोर उभा राहणार नाही, असं वातावरण कायम ठेवावं, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

शुक्रवारी (ता. १७) उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर येथे अंबडमध्ये झालेल्या ओबीसी महाएल्गार सभा आणि त्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया यावर फडणवीस बोलत होते. ओबीसी सभेतील नेते किंवा मनोज जरांगे पाटील यापैकी कुणी काय म्हणाले हे आपण अद्याप प्रत्यक्ष ऐकलेलं नाही. त्यामुळे यासंदर्भात अधिक भाष्य करणार नाही, असं फडणवीस म्हणाले. (DCM Devendra Fadnavis Appeals From Nagpur to OBC & Maratha Leaders Including All Community to Keep Harmony In Maharashtra)

आपण केवळ एकच विनंती करू शकतो, की सर्व समाजांनी शांतता आणि संयम ठेवावा. कोणताही समाज एकमेकांसमोर येणं योग्य नाही. पुन्हा पुन्हा सांगतो की राज्य सरकार ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार संकल्पबद्ध आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात स्पष्ट घोषणा केलेली आहे. त्यामुळं दोन्ही समाजानं कोणताही संभ्रम मनात बाळगण्याचं काहीच कारण नाही.

संभाजीराजे छत्रपती यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर केलेल्या टीकेच्या बाबतीत बोलताना फडणवीस म्हणाले की, सभेत कोण काय म्हणालं मला त्याबद्दल माहिती नाही. आपण पूर्णवेळ प्रवासात होतो. त्याबद्दल यासंदर्भात काहीही भाष्य करणार नाही. आपण केवळ एकच सांगणार आहे की, मराठा आणि ओबीसी समाजातील नेते, कार्यकर्ते व आंदोलकांनी निश्चिंत राहावे. कुणाचाही हक्क न मारता मराठा समाजाला आरक्षण नक्की मिळेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मायनिंग फंडातून योजना सुरू करत गोरगरीब लोकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सुरुवात करण्यात येणार आहे. उपराजधानी नागपुरातून त्याची सुरुवात होत असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. ‘वन ट्रिलियन इकॉनॉमी’साठी कमिटीने काही शिफारशी केल्या होत्या. त्याअनुषंगाने एक ‘रोड मॅप’ मंत्रिमंडळपुढे ठेवण्यात आला आहे. या शिफारसी कशा पद्धतीने राबवायच्या आणि महाराष्ट्रात गुंतवणूक कशी आणता येईल, यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यासाठी जो आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासंदर्भात प्रत्येक विभागासोबत बसून त्याची अंमलबजावणी कशा तयार केली पाहिजे यावर विचार होणार आहे. त्यादृष्टीने पुढची कार्यवाही होईल. महाराष्ट्रात एक चांगली सुरुवात झाली आहे. निश्चितपणे गुंतवणूक वाढवून रोजगाराच्या संधी राज्यात मिळतील. अर्थव्यवस्थेला त्यातून चालना देता येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Edited by : Prasannaa Jakate

OBC & Maratha Reservation
Nagpur Assembly : अधिवेशनासाठी नागपुरात तयारी जोरात; सेंट्रल हॉलचाही प्रस्ताव

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com