Devendra Fadnavis : 'पंतप्रधान मोदी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतील, तेव्हापासून...'; फडणवीस नेमकं काय म्हणाले ?

Ram Mandir Inaugration : 22 जानेवारीचा दिवस अगदी उत्सवाप्रमाणे साजरा करण्याचे आवाहन फडणवीस यांनी केले.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Bhandara News: अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत असल्याने उद्याचा दिवस उत्सवाचा आहे. पंतप्रधान मोदी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतील. तेव्हापासून एक नवीन भारत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. खासदार सुनील मेंढे यांच्या रामरथ यात्रेच्या समारोपाप्रसंगी देवेंद्र फडणवीस बोलत होते. त्यामुळे 22 जानेवारीचा दिवस अगदी उत्सवाप्रमाणे साजरा करायचा असल्याचे आवाहन फडणवीस यांनी केले.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, मीरबाकीने पंधराशे अठ्ठावीसला रामाचं मंदिर तोडलं. त्यावेळी मुघल असलेल्या बाबाराला हे माहिती होतं की, जोपर्यंत आम्ही या देशाच्या मनातून राम आणि कृष्ण हे काढत नाही, तोपर्यंत या देशाला गुलाम करता येत नाही आणि म्हणून आक्रमण केलं.

18 मोठ्या लढाया झाल्या. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रयत्नातून पुन्हा त्या ठिकाणी मंदिर व्हावं, अशा प्रकारचे अनेक प्रयत्न झाले. पण खऱ्या अर्थाने 6 डिसेंबर 1992 ला कार सेवकांनी कलंकाचा ढाच्या खाली आणला आणि त्या ठिकाणी छोटं राम मंदिर तयार झालं. आम्ही तोपर्यंत म्हणायचो 'रामलल्ला हम आयेंगे मंदिर वही बनायेंगे'. अखेर मोदीजींनी ते भव्य मंदिर देखील आता त्या ठिकाणी तयार केलं. उद्या त्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा ही होत आहे, असं फडणवीस म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Devendra Fadnavis
Ayodhya Ram Temple : राम मंदिरासाठी जीवाचे रान केले; आता मात्र दुर्लक्षित, कोण आहेत 'ते' नेते ?

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, आज अनेक कार सेवकांचा सत्कार झाला. मला देखील आठवतो दोन्ही कार सेवांमध्ये मी होतो. आमचे सुनील मेंढेंजी जोनपुरच्या जेलमध्ये होते. मी बदायूच्या जेलमध्ये होतो. तर 1992 ला देखील ज्यावेळी हा ढाच्या पाडण्यात आला, त्यावेळी आम्ही सगळे त्या ठिकाणी होतो. यावेळी मला असं वाटतं की हा ढाच्या जेव्हा खाली पडला, त्यावेळी गुलामगिरीतून बाहेर आण्याचा जो अनुभव आपण सगळ्यांनी घेतला आहे, तो अत्यंत महत्त्वाचा आहे.

फडणवीसांनी सुनील मेंढेंना दिली मोठी जबाबदारी

देवेंद्र फडणवीस यांनी खासदार सुनील मुंडे यांना मोठी जबाबदारी दिली. ते म्हणाले, आज खरं म्हणजे आपल्याला या देशांमध्ये रामराज्य आणायचं आहे. रामराज्य म्हणजे काय ? रामराज्य म्हणजे समाजातल्या शेवटच्या व्यक्तीचा आवाज हा तितक्याच दृढपणे ऐकला गेला पाहिजे. समतेचा राज्य, समानतेच राज्य, रामराज्य म्हणजे गोरगरीब, शोषित, आदिवासी, महिला अल्पसंख्यांक सगळ्यांना न्याय देणारं न्यायचं राज्य म्हणजे रामराज्य होय.

तेच राम राज्य या देशांमध्ये आणण्याचा प्रयत्न आपले प्रधानमंत्री मोदीजी करत आहेत. उद्यापासून रामराज्याकडे आपली वाटचाल सुरू होते आहे, असंही ते म्हणाले. ही रथ यात्रा इथेच न थांबवितात तुम्ही जोपर्यंत रामराज्य येत नाही तोपर्यंत आपली राम रथयात्रा सुरू ठेवायची आहे, असंही फडणवीस मेंढे यांना म्हणाले.

(Edited By : Ganesh Thombare)

Devendra Fadnavis
Maval Lok Sabha: 'पुढील सभा विजयाची असेल...'; आदित्य ठाकरेंनी खासदार बारणेंना ललकारलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com