Maval Lok Sabha: 'पुढील सभा विजयाची असेल...'; आदित्य ठाकरेंनी खासदार बारणेंना ललकारलं

Aditya Thackeray and Shrirang Barne: आदित्य ठाकरेंनी मावळात लोकसभेचे रणशिंग फुंकले
Aditya Thackeray and Shrirang Barne
Aditya Thackeray and Shrirang BarneSarkarnama
Published on
Updated on

Pimpri News: शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मावळ लोकसभेचा झंझावाती दौरा रविवारी (ता.21) केला. त्यात त्यांनी तळेगाव दाभाडे येथे पुढील सभा विजयाची असेल, असा दावा ठोकला. त्यातून त्यांनी मावळचे शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांना आव्हान देत ललकारले. त्यातून मावळची जागा ही महाविकास आघाडीच्या जागावाटपात ठाकरे शिवसेनेकडे जाणार हे सुद्धा जवळपास नक्की झाले.

लोणावळ्यापासून आदित्य ठाकरे यांचा हा दौरा सुरु झाला. त्यात त्यांची पहिल्यांदाच तळेगावात सभा झाली. त्यामुळे त्याविषयी मोठे उत्सुकता होती. ती त्यांनी धडाकेबाज भाषण करीत सार्थ ठरवली. मावळातून गुजरातला नेण्यात आलेला पावणेदोन लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा, एक लाख रोजगार देणारा 'वेदांता फॉक्सकॉन'चा प्रकल्प आणि तळेगाव 'एमआयडीसी'तील बंद केलेल्या जनरल मोटर्स कंपनीचा प्रश्न उपस्थित करून त्यांनी स्थानिकांच्या भावनेला हात घातला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Aditya Thackeray and Shrirang Barne
Aaditya Thackeray : '...तर महाशक्तीला आडवं करू', आदित्य ठाकरेंनी फुंकले लोकसभा निवडणुकीचे रणशिंग!

तसेच भाजपचे हिंदुत्व आणि शिवसेनेच्या हिंदुत्वातील फरक त्यांनी यावेळी समजावून सांगितला. पुढील पिंपरीच्या सभेला उशीर होत असल्याने आटोपशीर परंतू आक्रमक व मुद्देसूद भाषण त्यांनी केले. आदित्य ठाकरे यांनी खासदार बारणे यांना आव्हान देण्यापूर्वी त्यांच्या पक्षाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांनीही मावळात पक्षाचा खासदार निवडून आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा आपल्या आटोपशीर, पण आक्रमक भाषणात बारणेंना दिला. त्यासाठी सारी ताकद पणास लावू, असे ते म्हणाले. पक्षाच्या जीवावर नाही, तर स्वता:च्या वैयक्तिक बळावर जिंकलो, असे म्हणणाऱ्या बारणेंना दाखवून देऊ, अशी गर्जनाही त्यांनी केली.

तळेगावातील या सभेला पिंपरी-चिंचवडमधील शिवसेनेच्या नेत्यांनी आवर्जून हजेरी लावली. त्यात पिंपरीचे माजी आमदार अॅड.गौतम चाबूकस्वार, माजी शहरप्रमुख योगेश बाबर, नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून (अजित पवार) शिवसेनेत गेलेले पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर आणि शिवसेनेचे मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे-पाटील, भाजपमधून शिवसेनेत आलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्तारुढ भाजपचे माजी गटनेते आणि शिवसेनेचे राज्य संघटक एकनाथ पवार आदी यावेळी व्यासपीठावर होते. तेथे आदित्य यांच्यासह सर्वांना सारख्याच समान उंचीच्या खुर्च्या होत्या.

(Edited By : Ganesh Thombare)

Aditya Thackeray and Shrirang Barne
Aaditya Thackeray News : महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार येणे का गरजेचे?; आदित्य ठाकरेंनी सांगितले कारण....

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com