Assembly Election 2023 : मतटक्का वाढल्यानं काँग्रेसला कळलंय ‘पनौती कोण’

Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीत भाजपला भक्कम यश मिळण्याचा दावा
DCM Devendra Fadnavis.
DCM Devendra Fadnavis.Google
Published on
Updated on

Nagpur News : चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मतटक्क्यात वाढ झालीय. तेलंगणातही पक्षाचा मोठा उदय झालाय. या निवडणुकीत भाजपनं 639 पैकी 339 जागा जिंकल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीतही भाजपला मोठं यश मिळेल, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

नागपूर येथील धरमपेठ परिसरात असलेल्या त्रिकोणी पार्क परिसरातील आपल्या खासगी निवास्थानी रविवारी (ता. 3) त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. (DCM Devendra Fadnavis Started At Nagpur Percentage Of Voting To BJP in Madhya Pradesh, Chattisgarh & Rajasthan Assembly Election 2023 Has Increased Party Will Win Lok Sabha Election 2024)

DCM Devendra Fadnavis.
Assembly Election 2023 : गडकरींकडून अभिनंदन, फडणवीसांच्या चेहऱ्यावर आनंद

भाजप-एनडीएचा चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत मोठा विजय झाला आहे. त्यामुळे लोकांमध्ये अद्यापही नरेंद्र मोदी नावी ‘क्रेझ’ असल्याचं फडणवीस म्हणाले. ‘इंडिया’ आघाडीला मतदारांनी पूर्णपणे नाकारलय. नरेंद्र मोदी यांनी केलेला विकास हा ‘लाँगलास्टिंग’ आहे तर काँग्रेस नेते राहुल गांधी हे केवळ एखाद्या ‘इव्हेंट’ सारखे काम करीत असल्याची टीकाही त्यांनी केली. चार राज्यातील विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणूक यांच्यात कोणताही संबंध नाही, आधीही नव्हता. मतदारांचं आधीच ठरलय की, लोकसभेत कुणाला विजयी करायचं असं फडणवीस म्हणाले.

काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केली. आता त्यांना कळलं असेल की खरा ‘पनौती’ कोण आहे, असं नमूद करीत फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर तीव्र प्रहार केला. तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये सध्या काँग्रेस वरचढ असली तरी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपलाच येथे यश मिळेल हे आजच लिहून घ्या असा दावाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. कर्नाटकमधील मतदारांना आपली चूक आता कळली आहे. त्यामुळं आजही येथे विधानसभेची निवडणूक झाल्यास भाजपला मोठं यश मिळेल असं फडणवीस म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांबद्दल देशात नाराजीचं वातावरण आहे. भाजपनं सुरुवातीपासूनच केवळ विकासाच्या मुद्द्यावर प्रचार केला. मध्य प्रदेशात तर तेथील सरकारनं ज्या योजना राबविल्या त्यातून आनंदीत झालेल्या मतदारांनी भाजपला कौल दिला. मध्य प्रदेशात महिलांचं मतदान क्रांती घडवेल असं भाकित आपण केलं होतं. ते भाकित खरं ठरल्याची आठवणही देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली. आगामी काळात भाजपची विजयाची घोडदौड ही नेत्रदीपक अशीच असेल. केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर देशाच्या विकासात आणखी भर पडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Edited by : Prasannaa Jakate

DCM Devendra Fadnavis.
Assembly Election Result 2023 : कौल ४ राज्यांचा, चाहूल लोकसभेची

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com