Congress Politics : काँग्रेस प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आळवला सूर; नाना पटोले हटाव काँग्रेस बचाव

Assembly elections Congress Nagpur Nana Patole state president : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला आलेल्या अपयशानंतर नागपूरमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बैठक घेत नाना पटोले यांना घेरलं आहे.
Nana Patole 1
Nana Patole 1Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. तो कशामुळे आणि कोणामुळे झाला याकरिता चिंतन शिबिर नागपूरमध्ये घेण्यात येणार आहे.

तत्पूर्वी या संदर्भात झालेल्या प्राथमिक बैठकीत सर्वांचा रोष प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर होता. त्यामुळे शिबिराच्या माध्यमातून नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी प्रामुख्याने केली जाणार असल्याचे समजते.

लोकसभेच्या निवडणुकीपासूनच नाना पटोले (Nana Patole) यांच्या कार्यशैलीच्या विरोधात अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यांना हटवण्याची मागणीसुद्धा केली होती. नागपूर येथे काँग्रेसच्या अधिवेशनानंतर दिल्लीतून आलेल्या अनेक बड्या नेत्यांकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र राहूल गांधी यांनी कोणाचेच ऐकले नाही. त्यांच्यावर विश्वास टाकला. लोकसभेच्या निवडणुकीत मोठे यश मिळाल्याने नाना पटोले यांची बाजू अधिक भक्कम झाली होती.

Nana Patole 1
Vikram Pachapute : '...तर राजीनामा देऊन पुन्हा आमदारकी लढवेन!'; भाजप आमदार पाचपुतेंना कॉन्फिडन्स, पाहा VIDEO

आता मात्र विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर नाना पटोले एकटे उघडे पडले. काँग्रेसचे अवघे 16 आमदार निवडून आलेत. त्यामुळे त्यांना हटवण्याची मागणीने पुन्हा जोर धरला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार अशी चर्चा होती. मात्र अद्याप त्यांनी राजीनामा दिला नाही. निकालानंत मुंबईत झालेल्या पराभूत उमेदवारांच्या बैठकीत मध्य नागपूरचे काँग्रेसचे (Congress) उमेदवार आणि युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके यांनी नाना पटोले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एजंट म्हणून काम करीत असल्याचा त्यांनी आरोप केला.

Nana Patole 1
Election Commission: दारुण पराभवानंतर 'ईव्हीएम'विरोधात रान पेटवणाऱ्या काँग्रेसला मोठा दिलासा; आयोगानं घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

आपल्याला काँग्रेसने उमेदवारी दिली होती. असे असताना पटोले यांनी एकाही पदाधिकाऱ्याला प्रचारासाठी पाठवले नाही. भाजपचच्या नेत्यांसोबत साटेलोटे केले. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या मुख्यालयातून निवडूण आल्यास आपले स्टेटस वाढेल अशी भीती त्यांना वाटत होती. याच कारणामुळे अप्रत्यक्षपणे पटोले यांनी भाजपला मदत केल्याचा दावा बंटी शेळके यांनी केला आहे.

तत्पूर्वी आज नागपूरच्या कॉफी हाऊसमध्ये प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवावर विस्तृत चर्चा व या पराभवाकरिता कोण-कोण जबाबदार यावर चिंतन करण्यासाठी शिबिर नागपूर येथे घेण्याचे ठरले. शिबिराची रुपरेषा ठरवण्यासाठी बुधवारी चार डिसेंबरला प्रमुख नेत्यांची एक बैठक घेण्यात येणार आहे. आज झालेल्या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव आर. एम. खान नायडू व कमलेश समर्थ याव्यतिरिक्त इकराम हुसेन, मनोज बागडे, रमण पैगवार, मोईन काझी, चंदू वाकोडीकर, संजय कडू, शादाब खान व वीरेंद्रसिंग ठाकूर उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com