Vijay Wadettiwar News: विजय वडेट्टीवारांवर नागपूर, रामटेकची जबाबदारी; काँग्रेसला बळ मिळणार?

Vidharbh Politic's : वडेट्टीवारांमुळे नागपूरचे राजकीय समीकरण बदलणार?
Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद मिळवल्यानंतर विजय वडेट्टीवार यांच्यावर नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे नागपूर आणि रामटेक मतदारसंघात त्यांना मोठे आव्हान पेलावे लागणार असून वडेट्टीवारांमुळे नागपूरचे राजकीय समीकरण बदलणार का, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर वडेट्टीवारांचे बुधवारी प्रथमच नागपुरात आगमन झाले. यावेळी विमानतळावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. नागपूरमध्ये शहराध्यक्ष, आमदार विकास ठाकरे यांचा शहरात चांगलाच दबदबा आहे. सत्तर टक्के पदाधिकारी त्यांच्या सोबत असून ते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे समर्थक मानले जातात.

Vijay Wadettiwar
Swabhimani Shetkari Sanghatna News : स्वाभिमानीची डेड लाईन, तुपकरांपर्यंत निरोपच नाही...

पटोले आणि वडेट्टीवार यांच्यात अनेक वर्षांपासून शितयुद्ध सुरू असल्याचे बोलले जाते. पटोलेंना हटवण्यासाठी वडेट्टीवार आणि माजी मंत्री व सावनेरचे आमदार सुनिल केदार यांनी अनेकादा दिल्ली वाऱ्याही केल्या. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत या दोघांनी प्रदेशाध्यक्षांसोबत उघड पंगा घेतला होता.

पक्षातर्फे अधिकृत घोषणा होण्याच्या आधीच या दोघांनी सुधाकर अडबाले यांची उमेदवारी जाहीर करून टाकली होती. त्यावेळी पटोले हे अडबाले यांच्या उमेदवारीसाठी अनुकूल नव्हते. मात्र, एकदा नाव जाहीर केल्याने त्यांचा नाईलाज झाला होता. नाराजीमुळे या निवडणुकीच्या प्रचारात ते फिरकलेही नव्हते.

Vijay Wadettiwar
Smriti Irani Challenge To Rahul Gandhi : लोकसभेत पुन्हा खासदार म्हणून आले अन् स्मृती इराणींनी केला राहुल गांधींचा पाणउतारा

त्यापूर्वी नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पटोले यांनी भाजपमधून रविंद्र भोयर यांना आयात करून उमेदवारी दिली होती. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असून हे केदार आणि वडेट्टीवार यांच्या पचनी पडले नव्हते. त्यांनी दिल्लीत दबाव वाढवून शेवटच्या क्षणी काँग्रेसचा उमेदवार बदलला. पण यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आरामात निवडून आले होते.

या सर्व घडामोडीत विकास ठाकरे यांचा गट प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्यासोबत होता. वडेट्टीवार मंत्री असतानाही ठाकरे समर्थक त्यांच्या बंगल्याकडे फारसे फिरकत नव्हते. देवडिया काँग्रेस भवनतर्फे मंत्री झाल्यानंतरही शहर काँग्रेसच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला नव्हता.

मात्र, आज ठाकरे समर्थक स्वागतासाठी नागपूर विमानतळावर उपस्थित होते. सर्व कार्यकर्त्यांना स्वागतासाठी उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांच्यामार्फत करण्यात आले होते. विकास ठाकरे समर्थक विजय वडेट्टीवार यांच्यासोबत सोबत गेल्याने राजकीय समीकरणे बदलत असल्याचे चित्र आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com