BJP on Action Mode: पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीनंतर भाजप ॲक्शन मोडवर; मित्र पक्षांची बोलवली तातडीची बैठक

BMC Election मुंबई महानगरपालिका निवडणूक पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Devendra Fadanvis News
Devendra Fadanvis Newssarkarnama
Published on
Updated on

BJP Politics: आगामी मुंबई महानगरपालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीकरिता सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. बिहारमधील पाटणा येथे भाजपच्या विजय रथ रोखण्यासाठी विरोधी पक्ष नेत्यांची बैठक पार पडली होती. त्यानंतर राज्यातील भाजप ॲक्शन मोडवर आले असून मित्र पक्षांची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत पुढील रणनीती संदर्भात आणि जागावाटपासंदर्भात प्राथमिक चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

भारतीय जनता पार्टीचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी (26 जून) राज्यातील युतीमधील शिवसेना शिंदे गट आणि इतर मित्र पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलवली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महापालिका निवडणुकीनंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या संदर्भात काय फॉर्म्युला असेल या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.

Devendra Fadanvis News
Rohit Pawar congratulates CM Shinde : रोहित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारचं यासाठी केलं अभिनंदन !

2014 आणि 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत असलेल्या सर्व घटकपक्षातील प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने ही बैठक बोलावल्याची माहिती आहे. या बैठकीमध्ये निवडणुकांच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. (BJP Politics)

विरोधकांच्या बैठकीदरम्यान दुसरीकडे विरोधकही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मजबूत मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी बिहारमध्ये विरोधी पक्षनेत्यांची बैठक पार पडली.या बैठकीला देशभरातील विरोधी पक्षातील जवळपास सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही बैठक बोलावलेल्या या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे,खासदार सुप्रिया सुळे असे प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. (Patna Opposition Meeting)

Devendra Fadanvis News
Patna Opposition Meeting : मोदींचा विजयाचा वारु रोखण्यासाठी विरोधकांनी ठरवली ही रणनीती..

निवडणुकीच्या संदर्भात कशाप्रकारे युती म्हणून समोर जायचे या संदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे. कोणता पक्ष किती जागा लढवणार आणि कोणत्या जागा लढवणार यावर देखील सोमवारी होणाऱ्या बैठकीत प्राथमिक चर्चा होणार आहे. शिवसेना शिंदे गटाकडून युतीत पहिले देण्यात येत असलेल्या तेवढ्याच जागा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आले होते. मात्र या जागेवर उमेदवार निवडून येऊ शकेल या जागेवर प्रथम चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदार संघाचे देखील अदलाबदली करता येईल का यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.

भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेल्या विवाद कशाप्रकारे टाळता येणार यासंदर्भात देखील या बैठकीत चर्चा होणार आहे विशिष्ट कल्याण डोंबिवली मतदार संघात ज्याप्रमाणे कार्यकर्त्यांमध्ये वाद अद्यापही मिटला नसल्याचे चिन्ह दिसत आहे या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे खासदार आहे या जागेवर भाजपने आपला दावा सांगितला आहे त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी राजीनामा देण्याची देखील तयारी केली होती मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी घेत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com