
अकोला : अकोल्याचे (Akola) निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांना गीत गायनाची प्रचंड आवड आहे. प्रशासकीय कामातून मिळालेल्या वेळातून ते आपला छंद जोपासत असतात. छंद जोपासत असताना त्यांनी आत्तापर्यंत तीन गीतं गायली आहेत. सध्या त्यांच्या भीमगीताची चर्चा अकोल्यात सुरू आहे.
भीमजयंतीचे औचित्य साधत डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्यावरील गीत नुकतेच प्रसारित करण्यात आले. उपजिल्हाधिकारी संजय खडसे आणि त्यांच्या पत्नी नीता खडसे यांनी हे गीत गायलं आहे. यापूर्वी या दाम्पत्याने कोरोना लसीकरण गीत, शिवजयंती विशेष गीत गायले होते. या दोन्ही गीतांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली होती. आता पुन्हा उपजिल्हाधिकारी खडसे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील भीमराया तुज नमो हे गीत गायलं आहे. हे गीत त्यांनी लोकांना समर्पित केले आहे.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कीर्ती जगभरात पसरली आहे. शिक्षणाचे प्रतीक, महिलांना सक्षमीकरण, दुर्बलांना बलशाली बनविण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्याची साक्ष भारतीय राज्यघटना आहे. त्यांची कीर्ती एवढी महान आहे की, त्यामुळे ते संपूर्ण विश्वात वंदनीय आहेत. अशा प्रकारचे विचार या गाण्यामधून मांडण्यात आलेले आहे. प्रा संजय खडसे ताण तणावातून मुक्ती मिळविण्यासाठी गायनाचा छंद जोपासतात, त्या छंदातून समाज प्रबोधनाचे गीत तयार केले.
यापूर्वी लसीकरण प्रबोधनाकरिता ‘सर्वांनी घ्यावं करून हे कोविड लसीकरण...’ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती पर्वावर ‘शिवरायांची जयंती आली...’ हे गीत संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. त्यानंतर आता ‘भीमराया तुझं नमो...’ हे गीत तयार करून लोकार्पण केले आहे. निमा अरोरा जिल्हाधिकारी अकोला यांच्या उपस्थितीत आणि सुप्रसिद्ध कवी विठ्ठल वाघ यांच्या हस्ते हे गीत प्रसारित करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.