Deshmukh criticizes Fadnavis : फडणवीसांची कृपादृष्टी फक्त नागपूरवर, इतर १० जिल्हे वाऱ्यावर…

Devendra Fadanvis : फडणवीस सद्यःस्थितीत स्वतःला स्वतःच्याच शहरात असुरक्षित समजत असतील.
Dr. Sunil Deshmukhand Devendra Fadanvis
Dr. Sunil Deshmukhand Devendra FadanvisSarkarnama
Published on: 
Updated on: 

Fadnavis gave ample funds only to Nagpur : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फक्त नागपूर जिल्ह्याचेच भले करण्याची जबाबदारी उचलली की काय, असे वाटते. कारण कॉंक्रीटीकरणासाठी त्यांनी फक्त नागपूरलाच भरभरून निधी दिला. विदर्भातील इतर १० जिल्हे मात्र त्यांनी वाऱ्यावर सोडले, असा घणाघाती आरोप माजी अर्थ राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी केला. (Only Nagpur and Chandrapur is not the whole of Vidarbha)

आज (ता. १६) सरकारनामाशी बोलताना डॉ. देशमुख म्हणाले, देवेंद्र फडणवीस सद्यःस्थितीत स्वतःला स्वतःच्याच शहरात असुरक्षित समजत असतील. त्यामुळे एकट्या नागपूरलाच खिरापत वाटणे सुरू आहे. स्वतःच्या जिल्ह्याला एक हजार कोटी आणि इतर जिल्ह्यांना एक कोटीसुद्धा दिले नाही.

आता निवडणुका तोंडावर आहेत. लोकांसमोर जायचे, तर कसे, हा प्रश्‍न कदाचित त्यांना भेडसावत असावा. त्यामुळेच ते असा भेदभाव करीत असावे. फक्त नागपूर आणि चंद्रपूर म्हणजे संपूर्ण विदर्भ नव्हे, असा टोलाही त्यांनी फडणवीसांना हाणला.

विदर्भ विकासाच्या नावाखाली रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी नागपूर शहराला एक हजार कोटी तर विदर्भातील अन्य शहरांना मात्र ठेंगा दाखविण्यात आला आहे. गेल्या आठ वर्षांत नागपूर शहर व जिल्ह्यासाठी १.१० लाख हजार कोटी रुपयांची विविध योजनांतील कामे सुरू असताना राज्य शासनाने याच शहरासाठी पुन्हा एक हजार कोटी देताना इतर शहर व जिल्ह्यांना टाळल्याने अन्यायाची परिसीमा झाल्याचा आरोप माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी केला आहे.

Dr. Sunil Deshmukhand Devendra Fadanvis
Eknath shinde - Devendra Fadanvis'नी केलं एकमेकांचं तोंडभरून कौतुक | Maharashtra Elections

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री व नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या रस्त्यांसाठी एक हजार कोटी रुपये मंजूर केले आहे. गेल्याच महिन्यात हा निधी मंजूर करण्यात आला असून त्यातील तीनशे कोटीच्या पहिल्या टप्प्यातील निधी महानगरपालिकेला अदा करण्यात आल्याचे डॉ. सुनील देशमुख यांनी म्हटले आहे. या रस्त्यांच्या सिमेंटीकरणाचा खर्च एक हजार कोटींच्या वर गेल्यास यातील काही रस्त्यांचा समावेश पुढील टप्प्यात करण्यात येईल, हे सुद्धा नमूद केले आहे.

अमरावती महापालिका क्षेत्रातील काही मुख्य रस्ते आणि मोठ्या नागरी वस्त्यांना जोडणाऱ्या अंतर्गत मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली असताना अमरावती महानगर पालिकेला एक छदामसुद्धा रस्त्याच्या काँक्रीटीकरणाकरिता देण्यात आलेला नाही. शहरातील कोणत्याही लोकप्रतिनिधी किंवा सरकारमध्ये सहभागी असलेल्या पक्षांच्या एकाही पदाधिकाऱ्याने अमरावती शहरातील रस्त्यांकरिता अशा आशयाची मागणी केल्याची बातमीसुद्धा वाचण्यात आलेली नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.

Dr. Sunil Deshmukhand Devendra Fadanvis
Bharat Gogawale जाहिरात वादावर स्पष्टच बोलले | BJP |Eknath Shinde | Devendra Fadanvis | Sarkanama

किमान मनपाने तरी प्रस्ताव करावा..

अमरावती (Amravati) महापालिका (Municipal Corporation) प्रशासनाने राज्य शासनाने नागपूर (Nagpur) महापालिकेला दिलेल्या निधीच्या धर्तीवर शहरातील उर्वरित मुख्य रस्ते, मोठ्या नागरी वस्त्यांना जोडणारे मार्ग यांच्या कायमस्वरूपी काँक्रीटीकरण करण्याकरिता प्रस्ताव सादर करून निधीची मागणी करावी.

अमरावती शहरातील नव्याने विकसित होणाऱ्या आउट स्कर्ट भागाच्या विकास करण्यासाठी २०१९ मध्ये तयार करण्यात आलेल्या डीपीआरच्या अनुषंगाने निधीची मागणी सुद्धा करावी, असे डॉ. सुनील देशमुख यांनी म्हटले आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.