Devendra Fadanvis News : अनिशा सिंघानी तुमच्या घरी कशी आली? सहा वर्ष संबंध कसे काय ठेवले?

Jalgaon : खत्री गल्लीतून गांजाचा मोठ्या प्रमाणात व्यापार चालतो.
Eknath Khadse and Devendra Fadanvis
Eknath Khadse and Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Legislative Council News : जळगावमध्ये माजलेली अनागोंदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते एकनाथ खडसे यांनी आज सभागृहात मांडली. गुटखा, गांजा, दारू सर्रास सुरू आहेत आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये अंधार आहे, याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. (A large amount of ganja is traded through Khatri Gali)

एकनाथ खडसे म्हणाले, एकट्या जळगावात पोलिसांना दोन ते अडीच कोटीच्या वर हप्ता जमा होतो. खत्री गल्लीतून गांजाचा मोठ्या प्रमाणात व्यापार चालतो. पोलिसांनी कारवाया केल्या तरी त्या थातूरमातूर असतात. एकीकडे ग्रामीण रुग्णालय अंधारात आहे. वीज कापली जाऊ नये, म्हणून काही केले पाहिजे. पण सरकारचे त्याकडे लक्ष नाही.

बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील जमिनीत गैरव्यवहार झाला. यासंदर्भात तारांकित प्रश्‍न केला असता, त्याची चौकशी करू असे सरकारने सांगितले. पण अद्याप चौकशी झाली नाही. मुंबईत डेनाईट क्लब सुरू आहेत, लॉ, पब्स यावर कोणाचाच अंकुश नाही. तिकडे कोयता गॅंगचा धुमाकूळ सुरू आहे. म्हसले, पारनेर, सिंहगड, नांदेड फाटा, ससून रुग्णालय परिसरात या गॅंगची दहशत आहे. सरकारला याकडे लक्ष द्यायला वेळ आहे का, असा प्रश्‍न खडसेंनी केला.

पोलिसांच्या बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आहेत. एसपींना अधिकार दिल्यामुळे मनमानी पद्धतीने बदल्या केल्या गेल्या. गुन्हा दाखल करण्यासाठी मला न्यायालयात जावे लागले. पण यंत्रणेने दखल घेतली नाही. वाळू माफियांनी जळगाव जिल्ह्याच्या अकलूजमध्ये धुमाकूळ घातला आहे.

एक आठवड्यापूर्वी याच वादातून तेथे खून झाला. नंदूरबार जिल्ह्यात माजी आमदार शिरीष चौधरी बलात्कार करून खून झाल्याचे प्रकरण उघडकीस आणले. पण अजूनही त्यातील गुन्हेगार सापडले नाहीत. एसपींनी साधी भेटही दिली नाही, असे खडसे म्हणाले.

Eknath Khadse and Devendra Fadanvis
Eknath Khadse News : एकनाथ शिंदे ऑटोचालक होते, म्हणून त्यांनीच ‘हा’ प्रश्न सोडवावा !

माझ्या विरोधात साधा चिठोराही सापडला नसताना एसआयटीसह इतर चौकश्या लावण्यात आल्या. पण अनिशा सिंघानी उपमुख्यमंत्र्यांच्या (Devendra Fadanvis) घरापर्यंत कशी पोहोचली, सहा वर्ष त्यांनी कसे काय संबंध ठेवले, याचे उत्तर द्यायला कुणी तयार नाही, असे म्हणत खडसेंनी थेट देवेंद्र फडणवीसांवर हल्ला चढवला.

सोलापूरकडून येणारी २०० कोटी रुपयांची दारू नवापूर येथे पकडण्यात आली. गुजरातच्या (Gujrat) सीमेवर ही कारवाई करण्यात आली. येथून गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात दारू जाते. सीमेवर सुरक्षा वाढवली पाहिजे. मंत्र्यांच्या दबावामुळे गुन्हे दाखल होत असतील, तर मंत्र्यांना समज दिली पाहिजे, असेही एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com