Maharashtra Legislative Council News : नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा आणि कोराडी वीज केंद्रांलगतच्या गावांमध्ये राखेमुळे होणारे प्रदूषण गंभीर पातळीवर गेले आहे. यासंदर्भात उमा खापरे यांनी आज विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला. यावर आता राखेच्या वाहतुकीला परवानगी देणार असल्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला सांगितले. (We will allow the transportation of ashes)
फडणवीस म्हणाले, म्हणाले, या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात राख तयार होते. पण त्या तुलनेत वापर होत नाही. आता आपण राखेच्या वाहतुकीला परवानगी देणार आहोत. नाशिकमध्ये मागणी आहे. पण राख नाही. पण आता त्यांची मागणी पूर्ण होणार आहे. हे सांगताच काही सदस्यांनी इतर प्रश्न उपस्थित केले.
अभिजित वंजारी यांनी कोळसा वाहतूक, सतेज पाटील यांनी रस्ता सुरक्षा, भाई जगताप यांनी मुंबई - पुणे एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक, अनिकेत तटकरे यांनी एक्सप्रेस वेवर स्पीड गन, एकनाथ खडसे यांनी प्रकल्पग्रस्तांना राख मोफत देणे, तर महादेव जानकर यांनी जुन्या मुंबई -पुणे रस्त्याच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले.
कोळशाच्या वाहतुकीसाठी नवीन सीसीटीव्ही आणि व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम केली आहे. कोळशाची गाडी थांबली तर किती वेळ थांबली, डी रुट केला का? काही काही रस्त्यांवर अनलोड होते मग कोळशात गोटे टाकले जातात. हे प्रकार होतात. पण नवीन सिस्टिममुळे ते होणार नाहीत, असे फडणवीसांनी सांगितले. कुणी प्रकल्पग्रस्त उद्योग करणार असतील तर सवलतीच्या दरात त्यांना राख देऊ. पण ट्रेडिंगकरीता देणार नाही. गैरव्यवहार झाला असेल तर पत्र द्या. कारवाई करू, असे त्यांनी खडसेंच्या प्रश्नावर सांगितले.
मुंबई-पुणे (Pune) एक्सप्रेस वेवर आयटीएमएस सिस्टीम तयार होत आहे. १०० टक्के सीसीटीव्हीवर दिसेल. मोटरसायकलवाले कर्मचारी ट्रक आणि ट्रेलर्सवर कारवाई करतील. ते रॉंग साईड येऊन लवकर कारवाई करू शकतात. आत्ताही अशा वाहनांवर कारवाई करत आहोत. आयटीएमएस सिस्टम पूर्ण झाल्यावर त्याचा उपयोग होईल.
रस्ता सुरक्षा सप्ताहाप्रमाणे वर्षभरही तसेच काम केले पाहिजे. पण कायद्याचा प्रश्न आहे. दंडाची वसुली केली नाही. तर नोटीस कालबाह्य होते. २०० कोटीपेक्षा जास्त रक्कम सरकारला दंडातून मिळते. अजून तेवढीच रक्कम येणे बाकी आहे. मोबाईल अपडेशनच्या सूचना देऊ, असे फडणवीसांनी सांगितले.
जुन्या मुंबई (Mumbai) - पुणे महामार्गावर बहुतेक वेळेला वाट्टेल तशा गाड्या चालतात. विशेष करू घाटात छोट्या गाड्यांना जायला जागाच नसते. पहिल्या लेनमधून जाऊ नये लिहिले आहे. पण मोठी वाहने जातात. कठोर पावले उचलली, कठोर शासन केले. तरच काही होऊ शकते. हेवी ट्रक कासवापेक्षा कमी गतीने चालतात आणि रस्ते खराब करतात. पण आयटीएमएस सिस्टीम सुरू झाल्यावर या सर्व समस्यांवर उपाय निघणार आहे, असे फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.