Devendra Fadnavis : अखेर देवेंद्र फडणवीस पोहाेचले अकोल्यात....

BJP Politics : अकोला भाजपमध्ये सुरू असलेला लोकसभा आणि अकोला पश्चिम पोटनिवडणुकीचा वाद थांबविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अकोला गाठल्याची माहिती आहे. त्यांनी येथील शिवनी विमानतळानजीक एका हाॅटेलमध्ये पक्षाची आढावा बैठक घेतली.
Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule News
Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule NewsSarkarnama
Published on
Updated on

Akola Loksabha Election 2024 : अकोल्यात दोन निवडणुका आहेत. दुसऱ्या टप्प्यात अकोला लोकसभा आणि अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक आहे. अकोला लोकसभेचा उमेदवार निश्चित झाला आहे. पण, अनुप धोत्रे यांच्यावर अकोला संघ वर्तुळात घराणेशाहीचा आरोप होत आहे.

अशा परिस्थितीत अकोल्यात पक्षातील कार्यकर्ते एकसंघ ठेवणे त्याचबरोबर पक्षाने दिलेल्या उमेदवाराची तयारी आणि इतर गोष्टींचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अकोला गाठले आहे.

Akola BJP meeting Devendra Fadnavis And Chandrashekhar Bawankule
Akola BJP meeting Devendra Fadnavis And Chandrashekhar Bawankule Sarkarnama

अकोला लोकसभा मतदारसंघाचा आढावा आणि अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीचा उमेदवार निश्चित करणे व त्याचबरोबर निवडक पदाधिकारी व नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचा आजचा दौरा सुरू झाला आहे.

या दौऱ्यात त्यांनी भाजपच्या मोजक्याच नेत्यांसोबत चर्चा करत अकोला लोकसभा मतदारसंघाचा सखोल आढावा घेतल्याची माहिती समोर येत आहे. पक्षातील पदाधिकाऱ्यांना त्यांनी महत्त्वाच्या सूचना केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule News
Congress Akola : काँग्रेसचे प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी मोठे 'गिफ्ट' !

अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपने अनुप धोत्रे या नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. अनुप धोत्रे यांची थेट लढत प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आहे. या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी ही भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांच्यावर आहे.

पण, मंगळवारी अनुप धोत्रे व रणधीर सावरकर यांचे जवळचे नातेवाईक प्रकाश पोहरे यांनी थेट प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहे. लोकसभा निवडणुकीच्या गंभीर परिस्थितीत अकोल्यात थेट अनुप धोत्रे व रणधीर सावरकर यांचे नातेवाईक विरोधातील उमेदवाराच्या घरी बंदद्वार चर्चा करत असल्याने भाजप नेते व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.

ही स्थिती सुधारण्यासाठी अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा संयुक्त दौरा सुरू झाला आहे. या दौऱ्यात नेमके काय झाले, याचे वृत्त अद्याप बाहेर आले नसून दौऱ्यात शिवनी विमानतळानजीकच्या एका खासगी हाॅटेलमध्ये भाजप नेत्यांसोबतची बैठक सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

अकोला पश्चिम मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक असून, या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून भाजप नेते हरिश आलिमचंदानी यांचे नाव आघाडीवर आहे. त्याचबरोबर या मतदारसंघात भाजप नेते विजय अग्रवाल, कृष्णा शर्मा यांच्यात चुरस आहे. या ठिकाणी भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनानंतर येथे पोटनिवडणूक होत आहे.

या ठिकाणी अनेक इच्छुक उमेदवार असून, त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. अकोला लोकसभा मतदारसंघाबरोबर अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक यामुळे इच्छुक उमेदवारांचे तिकीट कापल्यानंतर ते दोन्ही निवडणुकीत पक्षाचे काम करणार नाही, अशी भीती भाजपला जाणवत आहे. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीचा प्रचारास सुरुवात करताना भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनेला डावलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

R

Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule News
Lok Sabha Election 2024 : ...म्हणून महायुती मनसेला सोबत घेत आहे; राज ठाकरे-अमित शाहांच्या भेटीवर जयंत पाटलांची टीका

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com