Teacher Constituency Election News: अखेर भाजपचं ठरलं, नागो गाणार लढणार नागपूर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक

Bacchu Kadu : प्रहारचे दोन तर मेस्टाचे तीन उमेदवार असणार आहेत.
Devendra Fadanvis, Nago Ganar, Nitin Gadkari and Chandrashekhar Bawankule
Devendra Fadanvis, Nago Ganar, Nitin Gadkari and Chandrashekhar BawankuleSarkarnama

Nagpur Division Teacher Constituency Election : नागपूर (Nagpur) विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपचा उमेदवार कोण असणार, याबाबतची उत्सुकता तशी कालच कमी झाली होती आणि दोन टर्म या मतदारसंघातून आमदार राहिलेले नागो गाणार हेच उमेदवार असतील, हे जवळपास निश्‍चित झाले होते. आज त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आली आहे.

नामांकन अर्ज दाखल करण्याचा उद्या १२ जानेवारी हा शेवटचा दिवस आहे. एक दिवस आधी भाजपने (BJP) आपला उमेदवार जाहीर केला. एक कॉंग्रेसचा (Congress) उमेदवार सोडला तर शिक्षक भारती, शिक्षक परिषद, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) उमेदवार घोषित केले आहेत. शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे, वंचित बहुजन आघाडीचे दीपराज खोब्रागडे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले आणि आज भाजप समर्थीत शिक्षक परिषदेचे नागो गाणार यांची उमेदवारी निश्‍चित झाली आहे. आता कॉंग्रेसचा उमेदवार कोण याची प्रतीक्षा आहे.

प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू हे मेस्टा संघटनेसोबत मिळून राज्यातील दोन पदवीधर आणि तीन शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकी लढणार आहेत. यामध्ये प्रहारचे दोन तर मेस्टाचे तीन उमेदवार असणार आहेत. अमरावती विभाग पदवीधर मतदार‎ संघासाठी किरण चौधरी,‎ मराठवाडा-औरंगाबाद शिक्षक‎ मतदार संघातून डॉ. संजय तायडे,‎ कोकण विभाग शिक्षकमधून नरेश कोंडा आणि‎ नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातून ॲड. प्रा. सुभाष‎ जंगळे या उमेदवारांची नावे निश्‍चित झाली असल्याचे प्रहारच्यावतीने कळवण्यात आले आहे. पण नागपूर शिक्षक मतदारसंघातून कोण लढणार याची घोषणा मात्र अद्याप झालेली नाही.

Devendra Fadanvis, Nago Ganar, Nitin Gadkari and Chandrashekhar Bawankule
शिक्षक मतदारसंघ निवडणूक : शिक्षक भारतीने नाना पटोलेंना करून दिली ‘ती’ आठवण !

प्रहार आणि कॉंग्रेसकडून उमेदवार कोण असतील, याची प्रतीक्षा सर्व प्रमुख पक्ष आणि संघटनांना आहे. कॉंग्रेस आज उमेदवार घोषित करणार, अशी अपेक्षा आहे. प्रहारच्या उमेदवाराची घोषणा आज बच्चू कडू करणार होते. पण आज पहाटे अमरावतीमध्ये त्यांचा अपघात झाला. तेथे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे. त्यामुळे आज कदाचित ते घोषणा करणार नाहीत, असा अंदाज आहे. पण उद्या उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे त्यांना निर्णय घ्यावा लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com