Cricketnama 2023 : 'क्रिकेटनामा'त देवेंद्र फडणवीसांच्या 'एन्ट्री'ने विरोधी संघांना धसका!

Devendra Fadnvis : राजकीय पक्षाच्या संघ प्रमुखांनी आखलेल्या रणनीतीवर परिणाम
Devendra Fadnvis
Devendra Fadnvissarkarnama
Published on
Updated on

Nagpur News पद्मभूषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी (नागपूर) :

कोणाची दंडी कधी गूल करायची, यात माहीर असलेले भाजपचे राज्यातील पाॅवरफुल नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या सोमवारी नागपूरमध्ये होत असलेल्या 'सरकारनामा' आयोजित 'क्रिकेटनामा'च्या मैदानात उतरत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या 'एन्ट्री'ने विरोधी राजकीय संघांच्या प्रमुखांनी आखलेल्या रणनीतीत बदल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या 'एन्ट्री'ने मात्र नागपूरकरांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

नागपूर हिवाळी अधिवेशनामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत असतानाच 'सकाळ माध्यम समूहा'च्या 'सरकारनामा'कडून उद्या सोमवारी नागपूरमधील श्यालेम स्पोर्ट्स ग्राऊंडवरील पद्मभूषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरी येथे 'क्रिकेटनामा' होत आहे. या 'सरकारनामा'च्या खेळामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. लागला आहे.

Devendra Fadnvis
Cricketnama 2023 : उपराजधानीत सोमवारपासून नेतेमंडळी मैदानात भिडणार; 'क्रिकेटनामा'ची उत्कंठा शिगेला

भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, प्रहार पक्षाने आपआपले संघ मैदानात उतरवले आहे. या राजकीय पक्षांनी विरोधकांची रणनीती लक्षात घेऊन खेळाडून मैदानात उतरवण्यासाठी निश्चित केले आहे. यासाठी एकमेकांच्या खेळाडू हेरण्याचे काम देखील संघप्रमुखांकडून केले जात आहे. त्यामुळे 'क्रिकेटनामा'चा ज्वर नागपूर अधिवेशनात देखील पाहायला मिळू लागले आहे.

Devendra Fadnvis
Cricketnama 2023 : शंभूराज देसाई चौकार, षटकारातून मुख्यमंत्री शिंदेंची ताकद वाढवणार...

परंतु 'क्रिकेटनामा'च्या मैदानात आता राज्यातील भाजपचे दिग्गज नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'एन्ट्री' निश्चित झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या 'एन्ट्री'मुळे विरोधी राजकीय संघांच्या खेम्यात धांदल उडली आहे. मैदानात उतरलेल्या राजकीय पक्षाच्या संघ प्रमुखांनी आखलेल्या रणनीतीवर देखील याचा परिणाम झाला असून, त्यात बदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या राजकीय मैदानात कोणाची दंडी कधी गूल, करतील याचा भरवसा नाही. हे सर्वश्रूत! एवढा पाॅवरफुल नेता खेळाडू म्हणून 'क्रिकेटनामा'च्या मैदानात उतरत असल्याने विरोधी राजकीय संघाने त्याची दखल घेण्यास सुरूवात केली आहे.

देवेंद्र फडणवीस हे 'क्रिकेटनामा'साठी त्यांच्या होमग्राऊंड उतरत आहेत. नागपूरमधील श्यालेम स्पोर्ट्स ग्राऊंडवरील पद्मभूषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील क्रीडानगरीच्या मैदानात देवेंद्र फडणवीस चमत्कारच करतील, असे त्यांचे सहकारी खेळाडू सांगत आहेत. देवेंद्र फडणवीस हे आमचा संघाचा 'हुकमी चेहरा' आहे. त्यामुळे विरोधी संघ निम्मा गारद झाल्याची चर्चा भाजपच्या संघात रंगली आहे. देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या राजकारणात जसा सूर गवसला आहे, तसाच 'क्रिकेटनामा'च्या मैदानात देखील त्यांना सूर गवसल्यास विरोधी संघाची दाणादाण उडल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास भाजप संघ बोलवून दाखवू लागला आहे.

Edited by Roshan More

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com